Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
जीवनात बरोबर निर्णय असं काहीच नसतं. जर तुम्ही एखादा निर्णय घेतला आणि तुमचं सर्व काही त्यामध्ये झोकून दिलं, तर ते सुंदररित्या घडून येईल.
जर प्रेमाचे, आनंदाचे, परमानंदाचे आश्रू तुमच्या गालांवरून ओघळले नसतील, तर तुम्ही अद्याप जीवन चाखलेले नाही.
ध्यानलिंग, ईश्वरी शक्तीचं सर्वोच्च स्तरावरील प्रकटीकरण. जो कोणी त्याच्या सान्निध्यात येतो, त्यामध्ये मुक्तीचं बीज पेरल्यावाचून राहत नाही.
तुमच्या जीवनातले परिश्रम, कष्टांनी नाही तर प्रेम आणि आनंदाने असू दे.
कधीच कुणाला उंच स्थानावर पाहू नका - कधीच कुणाला कमी लेखू नका. जेव्हा तुम्ही सगळ्यांना ते आहेत तसं पाहिलं, तर तुम्ही उत्तमपणे जीवनातून तुमची वाट शोधू शकाल.
हेतू एक गोष्ट आहे, कृती वेगळी. तुमच्यात आयुष्यात, तुमचा हेतू तुम्ही प्रत्यक्षात उतरवाल, की गोष्टींना योगायोगाने घडू द्याल, हा मोठा प्रश्न आहे.
अवघं अस्तित्व ही एक अखंड प्रक्रिया आहे. तुम्ही त्यापासून वेगळे नाही.
आपल्या नश्वर प्रकृतीकडे दुर्लक्ष करणं हे सर्वांत मोठं अज्ञान आहे.
जर या ब्रह्मांडाच्या पसाऱ्यात तुम्ही केवढे आहात हे तुम्हाला समजलं, तर तुम्ही अत्यंत नम्रतेने जगाल. ज्या कशाला तुम्ही स्पर्श करता ते तुमच्यासाठी एक आशीर्वाद ठरो.
विरक्ती म्हणजे अलिप्त राहणे नाही. तुम्ही खोलवर सामील आहात, पण अडकलेले नाही आहात.