Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
In the end, who you are is what will manifest in the world.
ज्या लोकांनी स्वतःचं जीवन नरक बनवलं आहे, त्यांनाच स्वर्गात जायचं असतं. ज्या लोकांनी त्यांचं जीवन स्वर्ग बनवलं आहे, ते कुठेही गेले तरी मस्त राहतात.
जर तुम्ही तुमचं जीवन प्रतिक्रियेकडून जाणीवपूर्वक प्रतिसादाकडे नेलंत, तर तुमच्या जीवनाची गुणवत्ता आणि अनुभव पूर्णपणे तुम्हीच ठरवू शकाल. हेच आत्मज्ञान आहे
वास्तवाचं स्वरूप मुळात सोपं आहे. अज्ञान त्याला गुंतागुंतीचं बनवतं.
प्रश्न हा नाही की जीवनाचा उपयोग काय आहे; ते जसं आहे तसं अगदी सुंदर आहे.
तुम्ही किती पैसे कमावता यावरून केवळ तुमच्या आयुष्यातील सोयीसुविधा ठरतात; आयुष्याची गुणवत्ता नाही.
निर्मितीचा मूळ स्रोत तुमच्यामध्येच आहे. तुम्ही फक्त त्याच्या संपर्कात येण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणं गरजेचं आहे
सत्य हे एखादं अंतिम ध्येय किंवा एखादा निष्कर्षही नाही. सत्य म्हणजे एक जिवंत अनुभव.
जीवन एक वैश्विक घडामोड आहे, त्यात सहभागी न झाल्यामुळे ते कंटाळवाणं वाटतं.
तुमच्या मनाच्या निश्चलतेत पारलौकिक बोधशक्ती आणि बुद्धिमत्ता दडलेली आहे.
प्रत्येक माणसाला जिवंत असतानाच शांततापूर्ण जगण्याचा हक्क आहे, फक्त मृत्यूनंतर त्यांना 'शांती मिळो' असं नको. चला आपण हे घडवून आणूया