कर्करोगातून मुक्तता झालेल्या व्यक्तीची कहाणी - आरोग्यासाठी ईशा योग
7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करताना कर्करोगातून मुक्त झालेल्या व्यक्तीची एक अविश्वसनीय, प्रेरणादायक कहाणी येथे सांगितली आहे.
“आम्ही प्रयत्न करू… जर तुम्ही जरा लवकर आला असता तर” असे ऐकून जयलक्ष्मीला समजले की तिच्या आधीच दुःखानं भरलेल्या जीवनात आणखीन एका किचकट समस्येची भर पडली. पण ती घाबरली नव्हती! तिला खात्री होती की तिच्याकडे असे काहीतरी होते ज्यामुळे ती या परिस्थितीमधून नक्कीच बाहेर पडेल. ते काय होते?
“आरोग्य हा अध्यात्माचा एक दुय्यम परिणाम आहे. जर तुम्ही तुमच्याआत परिपूर्ण असाल तर निरोगी असणे स्वाभाविक आहे. ”- सद्गुरु
8 जानेवारी, 2017 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या काही मिनिटे आधी, मी थोड्या धापा टाकत श्वास घेत असताना, माझ्यात काय घडते आहे हे मला माहिती नव्हते. मला फक्त येवढेच माहिती होते की, “मी पळते आहे.” 66 वर्षांच्या परिपक्व वयात मी ईशा विद्यालयातील मुलांसाठी मॅरेथॉन शर्यत धावत होते. शर्यत पूर्ण केल्यानंतर काही क्षणानंतर, मी एक दीर्घ श्वास घेतला आणि जमिनीवर बसले. तेंव्हा माझ्या असे लक्षात आले की फक्त माझी फुफ्फुसेच नव्हे तर… माझे हृदयसुद्धा आनंदाने आणि अभिमानाने धडधडत होते.धावण्याच्या वेळेत मागच्यावर्षापेक्षा मी 20 मिनिटांचीप्रगती केली आहे! पण हे या बेलगाम आनंदाचे मुख्य कारण नव्हते.
2004 मधे मागे वळून पहाताना
2004 मध्ये माझ्या बायोप्सीचा निकाल मोठ्यांदा वाचत असताना डॉक्टर गंभीरपणे म्हणाले, “जयलक्ष्मी, तुम्ही उशीर केलात.” 52 व्या वर्षी माझ्या डाव्या स्तनात कार्सिनोमा तिसर्या टप्प्यात असल्याचे निदान झाले - कर्करोग माझ्या खांद्यांच्या हाडांच्या खाली असलेल्या अनेक भागात पसरला होता. “आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू ... पण तुम्ही यापूर्वी आला असता तर बरं झालं असतं,” असे डॉक्टर पुढे म्हणाले आणि कर्करोग म्हणजे नक्की काय आहे असे त्यांनी मला मोघमपणे सांगायचा प्रयत्न केला. माझ्या हृदयावर हा एक मोठाच आघात झाला होता, पण मी ही बातमी मोठ्या धीराने स्वीकारली. परंतु मला माहिती होते की माझ्या आधीच दुःखी जीवनात आणखीनच समस्या निर्माण झालेल्या आहेत.
माझे पती, जे अन्यथा एक अतिशय चांगले आहेत, ते नोकरी गमावल्यामुळे मद्यपान करतात या वस्तुस्थितीशी मी झगडत होते. या परिस्थितीचा मला भावनिकदृष्ट्या अतिशय त्रास झाला आणि मी गंभीर नैराश्यात गेले असते परंतु शक्ती चालना क्रियेच्या दैनंदिन साधनेमुळे - या साधंनेंमुळे मी धीर धरला. आता, मला जेंव्हा समजले की मला अतिशय गंभीर असा जीवघेणा आजार झाला आहे मी यातून वाचले तरीही तो मला अनेक मार्गांनी कमकुवत करू शकतो – तेंव्हा माझे पती उध्वस्त झाले. पण मला भीती वाटत नव्हती. एक मुल शाळेत आणि दुसरं महाविद्यालयात असताना, मला येवढेच माहिती होते की मी जगलंच पाहिजे - मला माझ्या मुलांसाठी जगावेच लागले.
वेळापत्रक आखले गेले. माझ्या डॉक्टरांनी उपचारांच्या पहिल्या टप्प्यात केमोथेरपीची सहा सत्रे आणि रेडिएशनची 21 सत्रेपूर्ण करण्याची योजना आखली. माझी केमोथेरपी सुरू होण्यापूर्वी, मला असं ठाऊक होते की मला माझी योग साधना नियमितपणे सुरू ठेवावी लागेल. म्हणून मी ही साधना दिवसातून दोनदा करण्यास सुरवात केली. उपचार करण्यापूर्वी सकाळी एकदा आणि संध्याकाळी दुसर्यांदा मी शक्ती चालना क्रिया करत असे. खवळलेल्या समुद्रात एका लाकडाच्या ओंडक्याला पकडून बुडण्यापासून स्वतःला वाचवणार्या एखाद्या माणसाप्रमाणे मी हा सराव नियमितपणे सुरू ठेवला. आणि त्याचा फायदा झाला! माझ्या कल्पनेपेक्षा आणि माझ्या डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने आश्चर्यकारकरित्या याचा फायदा झाला.
केमो फक्त एका सत्रातच, माझ्या खांद्याच्या हाडाखाली खाली असलेले व्रण नष्ट झाले. सत्रानंतर थोडेसे पेटके आणि केस गळणे वगळता, संपूर्ण उपचारात माझ्यावर कोणताही दुष्परिणाम झाला नाही. मी सामान्य व्यक्तीप्रमाणे खात-पीत होते, मी सामान्यपणे झोपत होते आणि रक्त पेशीच्या अपुर्या संख्येमुळे मला कधीही केमो सत्र रद्द करावे लागले नाही. रूग्णालयात मी अशाच प्रकारच्या उपचारांमधून जाताना पाहिलेल्या बहुतेक लोकांना उलट्या होत होत्या, त्यांची भूक नाहीशी झाली होती आणि ते एखाद्या सांगाड्यांसारखे दिसू लागले होते. त्याउलट, मी पूर्णपणे ठीक होते. काहीवेळा केमो आणि रेडिएशन सत्राच्या वेळी मला माझ्याभोवती काही अक्षम्य क्षेत्राची उपस्थिती स्पष्टपणे जाणवत असे. चार महिन्यांच्या कालावधीत मी उपचार संपवून केन्द्रीय विद्यालयातील माझ्या अध्यापनाच्या नोकरीवर पुन्हा रुजू झाले, आणि त्यासाठी मी दररोज 15 किमी प्रवास करत असे.
वर्षानंतर, एकदा डॉक्टरांना आढळले की माझ्या स्तनामध्ये असलेली सूज उपचारांना प्रतिसाद देत नाहीये आणि त्यांनी मला शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली. नोव्हेंबरच्या अखेरीस माझ्यावर मास्टेटेक्टॉमी केली गेली - शस्त्रक्रियेच्या शेवटच्या घटकेपर्यंत मी माझी साधना केली. माझे आजारातून बरे होणे म्हणजे एक चमत्कारच होता. २ जानेवारीला हिवाळ्याच्या सुट्टीनंतर मी पुन्हा शाळेत रुजू झाले. 2006 पर्यंत माझ्या डॉक्टरच्या नियमित भेटी वर्षातून एकदा इतक्या कमी झाल्या होत्या.
12 वर्षांनंतर
माझ्या आयुष्यातील त्या वेदनादायक वेळेची आठवण या रम्य, मस्त रविवारी सकाळी काढत, नुकतीच 10 किलोमीटर चालून ही मी इथे आहे. 2007 पासून माझी सर्व औषधे बंद झाली आहेत आणि गेल्या दोन वर्षांपासून मी डॉक्टरांकडे गेलेली नाही. मी नियमितपणे ईशा कार्यक्रमांसाठी स्वयंसेवा करतो - ज्यामधील आनंद मला फक्त सहा वर्षांपूर्वी सापडला.
मला आठवते की ईशा कार्यक्रमांचे आयोजन आणि समर्थन करणारे लोक आश्चर्यचकित झाले. मीच मूर्ख होते, मी त्यावेळी गृहित धरले की ते लोक पगारावर काम करतात किंवा त्यांना हे काम संस्थेने सोपवले आहे. २०११ मध्ये माझ्या मुलांसमवेत शांभवी महामुद्रेची दीक्षा घेतल्यानंतरच मला कळले की ही संधी सर्वांसाठी खुली आहे. सर्व स्वयंसेवक खरोखर माझ्यासारखे ध्यानधारक आहेत आणि कार्यक्रमात मदत करतात कारण सद्गुरू ज्या पद्धतीने साधना करतात त्यामुळे ते काही प्रमाणात भारावून गेलेले आहेत.
मी हळूहळू स्वयंसेवेच्या या आश्चर्यकारक प्रक्रियेचा आनंद लुटायला लागले. आणि तेथेच माझ्या आयुष्यात एक महत्वाचे स्पष्ट वळण आले. 2013 मध्ये चेन्नईच्या मेगा प्रोग्रामसाठी स्वयंसेवा केल्यानंतर माझे आयुष्य कायमचे बदलले. मी आता स्वत:लादेखील ओळखत नाही. मी केवळ कर्करोगापासून वाचले असे नाही, तर मी मला स्वत:ला नकारात्मक मानसिकता आणि नाकारण्याच्या गर्तेतून बाहेर काढले आहे - हा प्राणघातक रोग माझ्यावर हल्ला करण्यापूर्वीच. आज माझ्या शस्त्रक्रियेनंतर मद्यपान संपूर्णपणे सोडणारा माझा नवरा माझ्या ईशामधील सहभागाला पूर्णपणेपाठिंबा देतो. माझी मुलेही नियमितपणे शांभवीचा सराव करत आहेत, आणि ईशाच्या कामात गुंतवून घ्यायला मला आवडते.
माझे आयुष्य विस्मयकारक आणि अर्थपूर्ण बनवल्याबद्दल ईशाचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत आणि मी सद्गुरूंची कृपा आणि करुणेसमोर नम्रपणे नतमस्तक होते.
जयलक्ष्मी चेन्नईमध्ये राहतात. 2011 मध्ये त्या केंद्रीय विद्यालय, मीनांबक्कम येथून सेवानिवृत्त झाल्या, परंतु 2016पर्यंत त्या शिकवत राहिल्या.