‘मात पिता तुम मेरे’ साऊंड्स ऑफ ईशातर्फे सादर अल्बम हा गुरु पौर्णिमा विशेष आहे. त्याची शब्दरचना आणि इंग्रजी अनुवादासहित तो येथे सादर करत आहोत.बहुतेक लोकांसाठी, त्यांचे इतरांबरोबर असणारे नातेसंबंध हा त्यांच्या जीवनानुभवाचा एक मूलभूत पैलू असतो. आपल्या सर्वात निकटच्या नातेसंबंधात – किमान आपण लहान मूल असताना –आपल्या आई वडिलांशी असलेला संबंध त्यात समाविष्ट आहे. आपला त्यांच्यावर एवढा गाढ विश्वास असतो की आपण त्यांच्या हातात झोपी जातो. मोठे होत असताना, आपल्या आयुष्यात अनेक नाजुक आणि जवळकीची नाती फुलत असतात. पण सर्वात निकटचे आणि अगदी जिव्हाळ्याचे नाते आपण निर्माण करू शकतो ते म्हणजे आपल्या गुरुंशी, जे आपल्या आपल्या कल्पनेपलीकडे आपल्या आयुष्याला स्पर्श करू शकतात. गुरूची उपस्थिती निर्विवाद असते आणि त्याच वेळेस ती अनाकलनीय आहे. सद्गुरू म्हणतात, गुरु ही काही एक व्यक्ती नाहीये, ती तर एक शक्यता आहे. ते स्पष्ट करून सांगतात, की गुरूंची साकार शरीररुपी उपस्थिती सीमित असू शकते, पण जो कुणी खरोखर आतुरतेने वाट पाहत असतो, तो ही शक्यता प्राप्त करू शकतो. एकदा ही शक्यता आपल्या आयुष्यात प्रकट होऊ लागली, की मग आयुष्य कोणत्या एका विशिष्ट दिशेने नेण्याची गरज नाही. तो सदासर्वत्र उपलब्ध असतो – तुमच्या प्रत्येक श्वासात –प्रत्येक गोष्टीत. सारे काही आपणच आहात सद्गुरू.
Subscribe