बेधूंद व्हायचंय? कुठलंही मादक पेय नाही, हँगओव्हर नाही - फक्त तुम्ही!
प्रत्येक मानवी अनुभवाचा रासायनिक आधार असतो. लोकं त्यांच्या आतली रसायनं बदलून त्यापासून आनंदी अनुभव प्राप्तीसाठी ड्रग्स, दारू किंवा असंच काहीतरी घेत असतात.
It’s that time again when people get sloshed at parties and wind up with massive hangovers to start off their new year. If you know someone like that, be a good friend and let him know about this post.
सद्गुरू: प्रत्येक मानवी अनुभवाचा रासायनिक आधार असतो. लोकं त्यांच्या आतली रसायनं बदलून त्यापासून आनंदी अनुभव प्राप्तीसाठी ड्रग्स, दारू किंवा असंच काहीतरी घेत असतात. तुम्ही अगदी क्षुल्लक सुखाच्या शोधात असाल तर माझा त्याला काही विरोध नाही. परंतु तुम्ही सुखाच्या शोधात असाल आणि तुम्हाला खूप जास्त सुख उपभोगण्याची घेण्याची संधी दिली गेली तर तुम्हाला आवडणार नाही का? जर तुम्ही निरंतर नशेत राहून पूर्णपणे सतर्क रहायला शिकू शकलात तर तुम्हाला ते आवडणार नाही का?
मला असं वाटत नाही की दारूमध्ये काही चूक आहे, मी त्याकडे दुर्लक्ष करत आहे कारण त्यात पुरेशी किक नाही. मी सतत कशाच्या तरी नशेत असतो - आयुष्याच्या नशेत. माझा केवळ श्वास मला नशेनं धुंद करू शकतो. लोक व्यसनात पडले आहेत कारण त्यांनी अनुभवलेली ही सर्वात मोठी गोष्ट आहे. मी त्यांना एक वेगळं पेय देत आहे जे दारूपेक्षाही जास्त मादक आहे. बहुतेक लोक ज्यांनी माझ्याबरोबर हे चाखलं आहे त्यांनी दारू सोडली आहे, त्यांना ती वाईट वाटते म्हणून नाही तर आता ती त्यांना क्षुद्र वाटते म्हणून. ते त्यापलीकडे गेले आहेत.
प्रश्न चूक की बरोबर याचा नाही. हा नैतिक दृष्टिकोन नाही. इतकंच की ते खूपच क्षुल्लक आणि सीमित आहे. तुम्ही आज रात्री थोडे पिता आणि उद्या सकाळी तुम्हाला एक मोठा हँगओव्हर मिळेल. परंतु मी दिवसातले चोवीस तास मद्यधुंद होऊ शकतो – आणि हँगओव्हर नाही, यासाठी काहीही किंमत द्यावी लागत नाही आणि हे आरोग्यासाठीही चांगले आहे! हा खरा मद्यपान करण्याचा उत्तम मार्ग नाही का? आम्ही मद्यपान, ड्रग्ज आणि या सर्व गोष्टी बालिश म्हणून पाहतो कारण निव्वळ जीवनाच्या उत्स्फुर्थतेच्या जोरावर आम्ही हजार पट नशा करू शकतो. फक्त वाइन का? तुम्ही डी-वाइन(दैवत्व) पिऊ शकता.
जेव्हा मी "इनर इंजिनीअरिंग" म्हणतो तेव्हा मी अशा तंत्रज्ञानाबद्दल बोलत आहे जिथे तुम्ही जाणीवपूर्वक परमानंदाचं रसायन तयार करू शकता. सध्या हे कधी कधी योगायोगाने घडत आहे, कुणीतरी त्याचं कारण बनत आहे. तुम्ही अजाणतेपणे जे काही करू शकता - सूर्यास्ताकडे पाहून किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीकडे बघून - तेच तुम्ही जाणीवपूर्वक देखील करू शकता. हाच "इनर इंजिनीअरिंग" चा आधार आहे.
तुमच्या आत, तुम्ही शांती आणि अशांती, आनंद आणि दु: ख, परमानंद आणि पीडा अनुभवली आहे. म्हणजे तुम्ही या सर्व गोष्टींअनुभवण्यास सक्षम आहात. परंतु आत्ता तुम्ही हा संपूर्ण अनुभव आणि ही रासायनिक प्रक्रिया अजाणतेपणे करत आहात. तुम्ही हे जाणीवपूर्वक करू शकता. सर्व अध्यात्मिक प्रक्रियेचा हाच प्रयत्न आहे - तुम्ही अजाणपणे जीवन निर्माण करुन गोंधळून जाण्याऐवजी तुमचं जीवन जाणीवपूर्वक घडवणं.