कोरोना – या कठीण प्रसंगात गरिबांची मदत कशी कराल
कोरोंना विषाणू महामारीमुळे भारताच्या सर्वात गरीब वर्गाचा भाग असलेल्या स्थलांतरित मजूर आणि दैनिक वेतन असलेल्या कामगार वर्गाला मोठ्या संकटात टाकणारी परिस्थिति निर्माण होत आहे. आपण समाजाचा एक भाग म्हणून त्यांची मदत करण्यासाठी समोर यायला हवे; त्याचवेळी आपण विषाणूचे वाहक होणार नाही याची काळजी सुद्धा घ्यायला हवी.
सद्गुरु: भारतात या विषाणू मुळे निर्माण झालेली एक मोठी चिंता गरीब आणि दैनिक वेतन कामावणार्या कामगार वर्गाची आहे. सुदैवाने भारत सरकारने शेतकरी, कामगार आणि मजूर लोकांसाठी तीन महीने आधार देऊ शकेल असं एक विस्तृत पॅकेज बनवलं आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांच्या सगळ्याच अडचणी मिटतील, पण या लोकांना किमान भुखमरीला तरी सामोरे जावे लागणार नाही. पण तरीही बरेचशे लोक कुठल्याच पॅकेज मध्ये कदाचित बसणार नाहीत आणि त्यांच्यापर्यंत या सेवा पोचणार नाहीत. अश्यावेळी समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
भारताचे नागरिक म्हणून कोणी भुखमरीला तर सामोरे जात नाहीत ना, याकडे आपण डोळे उघडे ठेऊन लक्ष देऊ या. जर कोणी तशा परिस्थितीचा सामना करताना दिसला तर आपण त्यांना आधार कसा देऊ शकू हे बघायलाच हवं – आपल्या स्वत:च्या हिमतीवर किंवा किमान इतरांच लक्ष त्यांच्याकडे वेधून. आपण स्वत:ला असं वचन देऊ या की भूक हे दू:खाचं आणि मृत्युचं कारण आपण ठरू देणार नाही. ही आपली जिम्मेदारी आहे. बाहेर आधीच खूप सार्या समस्या आहेत, आपण आपलं जीवन सुद्धा यातनदायक बनवायला नको.
स्थलांतरित मजुरांची दैना
आतापर्यंत दक्षिण भारतामध्ये विषाणूचा प्रभाव जास्त दिसून आलेला नाही. पण ग्रामीण भागातून मोठ्या शहरात स्थलांतरित झालेले मजूर आपल्या गावी परत जाण्यासाठि उतावीळ झाले आहेत. अश्या प्रकारे स्थलांतरीत झालेल्यांमद्धे पुरुषांचीच संख्या जास्त दिसून येते. बहुतेक वेळी त्यांच्याकडे जमिनीचा एखादा तुकडा असतो; ते शहारामध्ये वर्षातले ६-८ महीने काम करत असतांना त्याच्याकडे त्यांच्या घरच्या बायका लक्ष देतात. पण आता त्यांना माहिती आहे की शहरात काही काम मिळणार नाही, तिथे जीवाचा धोका आहे आणि त्यांच कुटुंब कसं आहे हे देखील त्यांना माहीत नाही. सरकार त्यांच्यासाठी वसतिगृह, जेवण अश्या सुविधा बनवण्याचा प्रयत्न करते आहे पण त्यांना मात्र घरीच जायचंय. शहराकडून त्यांचे लोंढेच्या लोंढे गावाकडे परतंत आहेत. त्यांच्या भावना आपण समजू शकतो पण ते दुर्दैवाने ते विषाणू सुद्धा आपल्या सोबत शहारा कडून ग्रामीण भागाकडे घेऊन जाऊ शकतात. मी आशा करतो की त्यांनी खूप सारी लागण आतापर्यंत गावाकडे नेली नाहीये आणि जास्त नुकसान नं करता ही परिस्थिति टळेल.
ईशा फाऊंडेशनचं योगदान
या जास्त लांबलेल्या लॉक-डाऊनमुळे अश्या असाहाय आणि असमर्थ लोकांची संख्या खूप वाढेल. आपले खूप सारे तरुण स्वयंसेवक खेड्यांमद्धे जाऊन तिथे काय करता येणं शक्य आहे ते बघत आहेत. ते योगा सेंटर मधून बाहेर पडत आहेत म्हणजे आता त्यांना हे सगळं संपल्याशिवाय इथं परत येता येणार नाही. आणि परत आल्यानंतर त्यांना १४ ते २८ दिवसांसाठी विलग ठेवण्यात येईल. हा एक प्रकारचा वनवासच आहे.
आपले स्वयंसेवक या भागात जेवण देऊ करत आहेत. आपण इतर सगळ्या गोष्टी पुढे ढकलू शकतो – दोन वेळचं जेवण सोडून. जे काही त्यांचं नेहमीच्या सवयीचं जेवण आहे ते तर आपण त्यांना देऊ शकत नाही पण किमान दोन वेळ पोट भरेल इतपत आपण देत आहोत. यासाठी जागेची जुळवाजुळव, मनुष्यबळ, किराणा सामान आणि भाजीपाला खरेदी इत्यादि गोष्टी युद्धं पातळीवर सुरू आहेत.
आणि आपल्या चीन मधल्या स्वयंसेवकांनी मास्क, ग्लव्हज, वैद्यकीय कर्मचार्यांसाठी सुरक्षा सूटस अशी वैद्यकीय मदत आपल्याला पाठवली आहे. पण सगळ्यात मोठी समस्या औषध पुरवठा करण्याची होणार आहे जो आपल्याला कदाचित फार मोठ्या प्रमाणावर लागू शकतो.
आपल्यावरचा आर्थिक भार वाढतच जाणार आहे. खूप सार्या लोकांनी भरपूर यगदान करून मदतीचा हात दिलाय. यापुढेही आम्हाला सतत मदतीची अपेक्षा आहे कारण ही स्थिति लवकर आटोक्यात येणारी नाहीये.
Editor’s Note:कोणी उपाशी राहतोय असं जर तुमच्या लक्षात आलं आणि तुम्ही स्वत: कुठली मदत करू शकत नसाल तर ईशा हेल्पलाइनला ८३००० ८३००० वर फोन करून सूचना करा; आमचे त्या भागातले स्वयंसेवक सक्रिय होऊन अधिक मदत करण्याचा प्रयत्न करतील. दुबळ्या आणि कमजोर लोकांची मदत करण्याच्या आमच्या ध्येयामध्ये सहकार्य करा. मदत करण्यासाठी http://ishaoutreach.org/beatthevirus Donate at http://ishaoutreach.org/beatthevirus.