Main Centers
International Centers
India
USA
Sadhguru Quotes
FILTERS:
SORT BY:
Clear All
योग म्हणजे जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये संतुलन साधणे आणि कौशल्याच्या नवीन पातळीवर पोहोचणे.
पैसा फक्त तुमच्या परिसराला सुखद बनवू शकतो. तो अंतर्गत सुख निर्माण करू शकत नाही.
मानवांची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांना त्यांचे विचार आणि भावना कशा हाताळायच्या हे माहीत नाही.
स्वतःला दुःखी करायचं असेल तर भरपूर संधी आहेत, कारण कोणी ना कोणी नेहमी तुम्हाला न आवडणारं काहीतरी करतच राहील.
जितके तुम्ही तुमच्या मनामुळे ओळखले जाल, तितके स्वतःपासून दूर जाल.
दैवी शक्तीची मुळे या शरीरात रुजलेली आहेत. जर तुम्ही मुळांचं पोषण केलं, तर फुलांना कसं टाळू शकाल.
तुम्ही जर अनिच्छेकडून इच्छेकडे, जडत्वाकडून उत्साहाकडे वळलात, तर तुमचं आयुष्य आनंदी आणि सहज होईल.
ध्यानलिंगाच्या क्षेत्रात काही मिनिटं शांत बसणं पुरेसं आहे. ध्यानाची कल्पना नसलेल्यांनाही खोल ध्यानावस्था अनुभवता येईल.
ध्यान म्हणजे निःसंगच्या जाणीवेकडे पोहोचणं. ही संकल्पना तुमच्या शरीराच्या किंवा मनाच्या नियंत्रणाबद्दल नाही, तर त्यांना मुक्त करण्याबद्दल आहे
शांती हे जीवनातलं सर्वोच्च ध्येय नाही. ती सगळ्यात मूलभूत आवश्यकता आहे.
महानपणाची महत्त्वाकांक्षा बाळगायची गरज नाही. जर तुम्ही 'माझं काय' या काळजीच्या पलीकडे गेलात, तर तुम्ही तसंही एक महान व्यक्ती बनाल.
जर तुम्हाला तुमच्या नश्वरतेची जाणीव असेल, तर तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी जे अत्यंत आवश्यक आहे तेच कराल.