योगाआसन करत असताना का बोलू नये?
सद्गुरु ह्या लेखात आपल्याला आसने करत असताना संपूर्णपणे शांतता राखणे आणि लक्ष एकाग्र करणे का आवश्यक आहे याची माहिती देत आहेत.
प्रश्न: आपण आसने करत असताना का बोलू नये, किंवा इतर लोकांच्या चुका का सुधारू नयेत?
सद्गुरु: एक आसन (योगासन) हा ध्यानाचा एक गतीशील सक्रीय प्रकार आहे. तुम्हाला स्थिर बसणं जमत नाही, म्हणून तुम्ही ध्यानस्थ होण्यासाठी हा वेगळा मार्ग अवलंबता. तुम्हाला योगसूत्रांविषयी सांगायचे झाले तर – स्थिरम्, सुखम् आसनम्, असे पतंजलि ऋषींनी सांगितले होते. जे अत्यंत स्थिर आणि सुखावह आहे ते आसन. याचा अर्थ असा आहे की तुमचे शरीर सुखद स्थितीत आहे, तुमचे मन सुखद स्थितीत आहे, आणि तुमच्यातील ऊर्जा ज्वलंत आणि संतुलित आहे. नैसर्गिकरित्या ध्यानस्थ स्थितीपर्यन्त पोहोचण्याची 'आसने ' ही पहिली पायरी आहे.
एका अर्थाने आसने म्हणजे ध्यानाचा एक गतीशील मार्ग आहे. तुम्ही ध्यानात असताना इतरांशी गप्पा मारू शकतो असा विचार करणे म्हणजे मूर्खपणा आहे. आसनांबाबत पण तसेच आहे. बोलण्याने तुमच्या शरीर प्रणालीत अनेक बदल घडून येतात. तुम्ही स्वतः ते तपासून पाहू शकता. आधी शांत बसून तुमच्या नाडीचे ठोके मोजा. त्यानंतर प्रचंड तीव्रतेने बोलू लागा आणि तुमच्या नाडीचे ठोके तपासून पहा – ती खूप वेगळीच असेल. नाडी हे केवळ एक उदाहरण आहे. बोलण्याने केवळ शारीरिक परिमाणे बदलत असे नाही – अगदी तुमच्या ऊर्जेची परिमाणे देखील प्रचंड प्रमाणात बदलतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, लक्ष पूर्णपणे एकाग्र असल्याशिवाय, आसने कशी करता येतील?
एकदा मला अमेरिकेतील एका योगा स्टुडिओमध्ये बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ही महिला ईशा साधक आहे आणि अनेक वर्षे ती योगशिक्षक म्हणून काम करते आहे. जेंव्हा मी तिच्या योगा स्टुडिओत आलो, तेंव्हा तिथे संगीत सुरू होते, आणि ती अर्ध मत्सयेंद्रासनात होती, आणि मायक्रोफोन मधून सतत एका गटाशी बोलत होती. जेंव्हा मी हे पहिले, तत्क्षणी मला तिथून निघून जावेसे वाटले, पण तिने मला ओळखले, 'हाय' म्हणाली, आणि आसनातून पट्कन उडी मारून माझ्याकडे आली. मी तिला एका बाजूला घेऊन गेलो आणि सांगितले की आसने शिकविण्याची ही पद्धत नाही कारण यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात गंभीर प्रकारे असंतुलन निर्माण होते, आणि असे लक्षात आले की तिला खरोखरच तसा त्रास होत होता. काही काळानंतर तिने शिकवणे सोडून दिले, आणि या सर्व समस्या गायब झाल्या.
आसने करत असताना अजिबात बोलता कामा नये, आणि वाट्टेल तेव्हा वाट्टेल ते आसन करणेही योग्य नाही. मी लोकांना 'बाथरूम ब्रेक ' मध्ये योगासने करताना पहिले आहे, कारण आपण योगा करतो आहोत हे त्यांना जगाला दाखवायचे असते. हा मूर्खपणा आहे. शौचालयात जाण्याची गरज न भासता, कोणाशी बोलण्याची गरज न भासता, काहीही पिण्याची गरज न भासता तुम्ही जर एकाच ठिकाणी स्थिर बसू शकत असाल – तर खरेतर ती तुम्ही योगा करत असल्याची एक चांगली जाहिरात होईल. तुम्ही योगा करत आहात हे लोकांना समजावे यासाठी तुम्हाला एखाद्या विशिष्ट आसनात बसून दाखवण्याची काहीही आवश्यकता नाही.
हा नियम आहे- की आसनात असताना तुम्ही कधीही कोणाशीही बोलू नये, कारण संपूर्ण एकाग्रतेने श्वास, आणि तुमच्या शारीरिक ऊर्जा यांकडे लक्ष देणे सर्वात महत्वाचे आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, आसने ही ध्यानाची प्राथमिक अवस्था आहे. ध्यानावस्थेमध्ये तुम्ही कोणाशी बोलू शकत नाही. आसने करत असताना तुम्ही जर बोललात, तर तुम्ही तुमचा श्वास, मानसिक एकाग्रता, आणि तुमच्या ऊर्जांची स्थिरता यांमध्ये व्यत्यय आणता.
चुका दुरुस्त करण्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले तर – एका अर्थाने, एखाद्या व्यक्तीची शारीरिक स्थिती सुधारणे म्हणजे कुबड्यांचा आधार घेण्यासारखे आहे. शिक्षकांनी जर योग्य प्रकारे चुका दुरुस्त केल्या, तर लोक काळजीपूर्वक आसने सुधारू शकतील. अन्यथा, कालांतराने, ते पुन्हापुन्हा त्याच चुका करतील. दुसरी गोष्ट अशी की, ते अगोदरच एका विशिष्ट आसनात असतील आणि तुम्ही त्यांना स्पर्श करून त्यांचे आसन सुधारण्याचा प्रयत्न केला, तर त्यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते.
उदाहरण द्यायचे झाले तर - फक्त माझी बोटे हलवण्यात सुद्धा अनेक गोष्टीं समाविष्ट आहेत. माझे स्नायू, स्नायूबंध, माझ्या शरीराचा सांगाडा, मन, आणि ऊर्जा या सर्वांना एका विशिष्ट मार्गाने काम करावे लागते. समजा तुम्ही माझे बोट पकडले आणि तुम्ही ते हलवण्याचा प्रयत्न केलात, तर ती एक संपूर्णपणे वेगळीच गोष्ट होते. म्हणून एखादी गोष्ट कशी करावी हे तुम्हाला संपूर्णपणे उमजेपर्यंत शिक्षकांनी तुम्हाला ती समजावणे आवश्यक आहे, पण तुम्ही तुमच्या आतून तो नेमकेपणा आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
Editor’s Note: Isha Hatha Yoga programs are an extensive exploration of classical hatha yoga, which revive various dimensions of this ancient science that are largely absent in the world today. These programs offer an unparalleled opportunity to explore Upa-yoga, Angamardana, Surya Kriya, Surya Shakti, Yogasanas and Bhuta Shuddhi, among other potent yogic practices.