गोपाळ: एक गुराखी म्हणून कृष्णाचं सार समजावून घेऊया!
सद्गुरू “गोपाळा” या जपाच्या अर्थाकडे आपले लक्ष वेधून घेत आहेत आणि कृष्णाच्या विविध पैलूंकडे – त्याचे सौन्दर्य, त्याची निर्भयता, आणि त्याने जीवनाच्या उत्साहाशी एकरूप होऊन कसे हसत खेळत जगायला शिकवले याचे सुंदर वर्णन करत आहेत.
सद्गुरू “गोपाळा” या जपाच्या अर्थाकडे आपले लक्ष वेधून घेत आहेत आणि कृष्णाच्या विविध पैलूंकडे – त्याचे सौन्दर्य, त्याची निर्भयता, आणि त्याने जीवनाच्या उत्साहाशी एकरूप होऊन कसे हसत खेळत जगायला शिकवले याचे सुंदर वर्णन करत आहेत.सद्गुरू “गोपाळा” या जपाच्या अर्थाकडे आपले लक्ष वेधून घेत आहेत आणि कृष्णाच्या विविध पैलूंकडे – त्याचे सौन्दर्य, त्याची निर्भयता, आणि त्याने जीवनाच्या उत्साहाशी एकरूप होऊन कसे हसत खेळत जगायला शिकवले याचे सुंदर वर्णन करत आहेत.
गोपाळा गोपाळा गोपी वल्लभ गोपाळा
गोविंदा गोविंदा रास लीला गोविंदा
गोपाळा गोपाळा गोपी वल्लभ गोपाळा
गोविंदा गोविंदा यदू कुल शूर गोविंदा
गोपाळा गोपाळा गोपी वल्लभ गोपाळा
गोविंदा गोविंदा मुरली लोला गोविंदा
गोपाळा गोपाळा गोपी वल्लभ गोपाळा
गोविंदा गोविंदा राधे मोहन गोविंदा
गोपाळा गोपाळा गोपी वल्लभ गोपाळा
गोविंदा गोविंदा रास लीला गोविंदा
सद्गुरू: गोपाळ म्हणजे काय? त्याचा अर्थ काय आहे? गो म्हणजे “गाय.” “पाळ” म्हणजे “जो तिची निगा राखतो तो” अर्थात कृष्णाला एक गुराखी म्हणून ओळखले जाते. सामान्यतः दैवत्व हे नेहेमी एकतर महान तपस्वी योगी किंवा काही वेळा एका राजाच्या स्वरुपात नजरेस पडते – पण एक गुराखी... सामाजिकरित्या, तो समाजाच्या कनिष्ठ पातळीवर असतो. म्हणून गोपाळा. तो केवळ एक गुराखी आहे – पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. अगदी सुरुवातीपासूनच त्याचे सौन्दर्य, त्याची बुद्धिमत्ता, त्याची ताकद, त्याचे शौर्य याकडे दुर्लक्ष करणे शक्य नव्हते. अगदी लहान बाळ असताना देखील तो कोण होता याकडे कोणाला दुर्लक्ष करता आले नाही. अनेक लोकांनी त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. “तो केवळ एक गुराखी आहे.” पण त्याचे हे रूपच इतर सर्व लोकांसाठी उत्सवी बनले. “तो एक गुराखी आहे!” आपण त्याचा उल्लेख जेंव्हा गोपाळ म्हणून करतो, तेंव्हा आपण त्याच्याविषयी ममत्वाने बोलत असतो. जेंव्हा आपण त्याला गोविंदा असे म्हणतो,तेंव्हा एक दिव्य शक्ती म्हणून त्याच्यासमोर आपण नतमस्तक होत असतो. एका क्षणी तो देव असतो, पुढच्याच क्षणी तो एक लहान मूल असतो, त्याच्या पुढच्याच क्षणी तो केवळ एक सामान्य मानव असतो – एकाच वेळेस त्याची अनेक रुपे दिसून येतात.
लीला म्हणजे नाट्य. जीवनाचे सखोल परिणाम, अस्तित्वाचे अद्वितीय स्वरूप नाट्याच्या माध्यमातून प्रदर्शित करता येते. रास म्हणजे जीवनरस असे आपण म्हणू शकतो. या शब्दाला चपखल असा इंग्रजी प्रतिशब्द नाही. तर रास लीला गोविंदा म्हणताना आपल्याला असे सांगायचे असते की तो एक अशी व्यक्ती आहे ज्याने जीवनाचा संपूर्ण आनंद लुटला आहे. संध्याकाळी काम संपल्यावर किंवा महिन्याच्या विशिष्ट दिवशी त्याने त्याच्या सवंगड्यांसोबत केलेल्या नृत्याला रास लीला असे संबोधले जाते. त्याचा अर्थ “जीवनरसांशी खेळणे” असा होतो. हळूहळू त्याच्याकडे, जिथे राग, इच्छा, आकांक्षांना थारा नाही, फक्त जीवनच अस्तित्वात आहे; एक अशी जागा, या अर्थाने पाहण्यास सुरुवात झाली. जीवनरस वाहू लागतात कारण त्या ठिकाणी कोणताही राग, आकांक्षा नव्हत्या. म्हणून नृत्य हे केवळ नृत्य राहिले नाही, तर त्याने रूपांतरणाचे वेगळे स्वरूप धारण केले.
हे स्वरूप अनेक मार्गांनी समोर आणले गेले आहे. देशाच्या विविध भागांमध्ये, ही कृष्ण संस्कृती अनेक मार्गांनी विकसित होत गेली कारण भारत हा एक बहुसांस्कृतिक देश आहे. तामिळनाडुमध्ये, “आसेय्युम, कोपमूम ईल्ला नगरम” असे गाणे गायले जाते. ते असे म्हणतात की ही एक अशी जागा आहे, जिथे कोणतीही इच्छा आकांक्षा किंवा राग नाही. जेंव्हा कोणताही राग किंवा इच्छा आकांक्षा नसते, तेंव्हा मानवाच्या मनात कोणत्याही वासना नसतात, तो फक्त आनंदी आणि प्रेमळ असतो.
मग आपण म्हणतो, “यदू कुल शूर.” तो यदूवंशीय म्हणजे यादव वंशातला आहे. ते एक राजघराणे होते. काही राजघराण्यांचे वंशज सूर्यवंशातील होते, काही चंद्रवंशातील होते. यदू कुळ चंद्रवंशीय होते. तर यदू कुल म्हणजे एका राजघराण्याचा उल्लेख आहे. शूर म्हणजे “एक शूर किंवा पराक्रमी व्यक्ती.” पण त्याच वेळी, हे एका आदिवासी जमातीचे नाव पण आहे ज्या वंशात त्याचा जन्म झाला होता. त्याचे पिता, वासुदेव हे शूर होते. हा शब्द या दोन्ही अर्थांनी वापरला जातो.
त्यानंतर आपण त्याला “मुरली लोला” असे म्हणतो, ज्याचा अर्थ “मुरली वादन प्रिय असणारी व्यक्ती.” मुरली म्हणजे “बासरी.” जो लोकांना त्याच्या मुरली वादनाने मंत्रमुग्ध करतो तो. आपण त्यानंतर त्याला “राधे मोहन” त्याचा अर्थ “जो राधेवर प्रेम करतो तो ”किंवा“ ज्याने राधेला मंत्रमुग्ध केले आहे तो.” हे दोन्ही अर्थांनी आहे – जो राधेमुळे मंतरामुग्ध झाला आहे तो आणि ज्याने राधेला मंत्रमुग्ध केले आहे तो.
शेवटची ओळ “श्याम सुंदर” अशी आहे. श्याम म्हणजे “संध्याकाळ.” त्याच्या त्वचेच्या रंगामुळे कृष्णाकडे एक संदिग्ध सौन्दर्य म्हणून पाहिले जाते. तो एखाद्या संध्याकाळ सारखा होता. जेंव्हा सूर्य नुकताच मावळतीकडे झुकलेला असतो, आकाशाचा दिवसभर असलेला निळा रंग लोप पावतो आणि एक गडद, अगदी काळानिळा रंग आकाशात दिसतो – त्याचा तसाच रंग होता. म्हणून त्याला श्याम सुंदर म्हणत असत.
Editor’s Note: Sadhguru explores the life and path of Krishna. Watch the Leela series, available as a free webstream – one part every week.