गुरु पौर्णिमेच्या सदगुरुंच्या कविता | Guru Purnima Marathi Kavita
गुरु पौर्णिमे निमित्त सदगुरुंच्या कविता आम्ही येथे प्रस्तुत करत आहोत. सदगुरुंच्या साधक अवस्थेतील त्यांचा आपला अनुभव आणि त्यांच्यावर गुरुकृपा झाली त्याक्षणीचा अनुभव ह्या कवितांमधून ओतप्रोत झालेला आहे याची प्रचीती वाचकांना येईल.
27 जुलै रोजी, सदगुरूसमवेत, आदियोगीच्या सानिध्यात गुरुपौर्णिमा साजरी करा. व्यक्तीशः ईशा योगा सेंटर मध्ये उपस्थित राहून किंवा लाईव्ह वेबस्ट्रीम पाहू शकता.
Read in Hindi: Guru Purnima Poems
Guru Purnima Marathi Kavita
सत्याच्या शोधात मी दोन्ही मार्ग धुंडाळले
काही पूजनीय मानले जाणारे तर काही विचित्र
पण कृपावंत गुरू आले आणि
त्यांनी माझ्या ज्ञानाच्या प्रवाहाला दिशा दिली
तृतीय नेत्राच्या पवित्र स्थानी
त्यांनी त्यांची काठी टेकवली
आणि मला वेड लावून गेले
या वेडेपणावर काहीच इलाज नाही
पण निखालस हीच मुक्ती आहे...
जेव्हा मी पाहिलं की
भयानक रोगसुद्धा
विनासायास पसरतात
तेव्हा मनुष्यप्राण्याला वेड लावायची
मोकळीक घेऊन मी कामाला लागलो
.
हरलो! हात टेकलेले मी
जीवन आणि मृत्यूच्या खेळापुढे
दोन्ही खेळ खेळलो मी
पण ढिम्म हललो नाही..
आणि अचानक एक माणूस
माझ्यापाशी येतो,
तो काठी टेकत चालणारा
मी नवयुवकासारखा सुदृढ
सगळं पाहून चुकलेलो मी
जन्म - मृत्यू आणि
जे जे म्हणून जीवन बहाल करतं, ते सगळं काही ..
तरी सुन्न बसून होतो..
तेव्हा हा काठीवाला माझ्यापाशी आला
अन् त्याची विद्युत्पाती काठी
माझ्या कपाळावर टेकवून गेला.
Editor’s Note: On July 27, celebrate Guru Purnima With Sadhguru, in the Presence of Adiyogi. Join in person at the Isha Yoga Center or watch the free live webstream.