महान संत कबीर यांनी म्हटलं, देव जर माझ्या समोर प्रगटला तरी मी आधी गुरुंच्या पायी नतमस्तक होईन, कारण त्यांनीच मला देव दाखविला. हा श्लोक गुरूची महिमा गातो आणि म्हणतो जीवनात प्रचंड संपत्ती, पद, मान-सन्मान, प्रतिष्ठा, ज्ञान, सोबत योग शक्ती सुद्धा जर प्राप्त केल्या पण जर गुरूची कृपा नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे.