गुरु : सद्गुरुंची त्यांच्या गुरूंबद्दलची एक दुर्लभ अभिव्यक्ती
या लघु लेखात सद्गुरु त्यांच्या आयुष्यातला सर्वात प्रभावी घटक त्यांचे गुरु आहेत हे सांगताहेत.
सद्गुरु: माझ्या आयुष्यातला सर्वात प्रभावशाली घटक म्हणजे माझे गुरु, इतर कोणतीही गोष्ट नाही. आजही माझ्या मनात, खरंतर माझ्या रोमारोमात, माझ्या स्पंदनांत आणि माझ्या जीवन ऊर्जेत त्यांचं अस्तित्व सगळ्यात प्रभावशाली आहे. माझं स्वतःच असं वैयक्तिक मन नसल्यामुळे मला हे असं ठेवणं फार सोप गेलं. कदाचित याच कारणामुळे जे माझ्याहून खूप पल्याड आहे, जे माझ्या पेक्षा फार प्रचंड विशाल आहे ते माझ्यामध्ये अलौकिकपणे स्पंदन पावते आहे.
जरी त्यांच्या स्पर्शाने मला सर्वोच्च अनुभव प्राप्त करून दिला आणि या जीवन आणि त्याही पलीकडची जाणीव करून दिली तरीही; मला स्पर्श केलेला हा कुणी एक माणूस असं मी माझ्या गुरूंकडे पाहत नाही. असं म्हणतात की जो पर्यंत ते आदियोगींकडून येत नाही, स्वतः शिवाकडून येत नाही तो पर्यंत ते खरं नाही, म्हणून माझ्या मनातील जुन्या धरणांमुळे कुणी एका मनुष्याचा मी गुरु म्हणून स्वीकार केला नसता. म्हणून माझ्या गुरूंनी माझ्याप्रती असलेल्या अनुकंपेतून त्यांनी स्वतः शिवाचं रूप धारण केलं.
मला हे माहिती नाही की हे रूप त्यांनी तेव्हा धारण केलं की त्यावेळी त्यांचं स्वरूप खरंच तसं होतं. पण हा अनुभव मला अशा ठिकाणी घेऊन गेलाय की त्यानंतर मला आयुष्यातील कोणतीही गोष्ट समजण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. ज्या ज्या क्षणी, मला जे जे काही कळणं गरजेचं आहे त्यासाठी माझा गुरू आणि शिव सदैव माझ्या पाठीशी उभे आहेतच.