मृत्यू सोबत जीवन जगणे
सद्गुरू स्पॉटच्या सर्वात नवीन सदरात, सद्गुरु आपण आयुष्यातील एकुलती एक, एकमेव निश्चित गोष्ट – म्हणजे मृत्यूसोबत अधिक जिव्हाळा दाखवावा याची आपल्याला आठवण करून देत नवीन वर्षाचे स्वागत करतात. मृत्यू म्हणजे एक अतिशय भयंकर गोष्ट आहे अशी समजूत बाळगूनच आपण मोठे झालो आहोत, पण सद्गुरु समजावून सांगतात की श्वास आणि उच्छवासाप्रमाणेच, आपण जीवन आणि मृत्यू या दोन्ही गोष्टींना सामोरे जायला हवे. योग्य पर्यायांची निवड कशी करावी आणि आपले अस्तित्व चमकदार कसे करावे याविषयी ते मार्गदर्शन करतात. “मृत्यू सोबत जगत” याचा स्वीकार करून तुम्ही तुमचे आयुष्य या पृथ्वीवर कसे व्यतीत करावे याची वेगळी संधी निर्माण करता.
काळ म्हणजे अनेक लोकांसाठी बरेच काही असू शकतो. काहीजण काळाचे बंधन वाहतात. एक लहान मूल आणि प्रौढ व्यक्ती यांच्यातील फरक, एक आनंदी जीवन असणारे लहान मूल आणि अनेक प्रौढ लोकं जसे दुखीः जीवन जगतात यातला फरक म्हणजे, मूलतः काळाचे ओझे असते. तुमची स्मृती कशी ठेवावी हे तुम्हाला माहिती नसल्याने काळ तुमच्यासाठी एक भलं मोठं ओझं बनून राहू शकतो.
2019. आणखी एक वर्ष संपले – एखादी व्यक्ती याकडे पाठीवर वाहून नेण्यासाठी आणखी एक वर्ष या नजरेने पाहू शकेल. पण एक वर्ष म्हणजे केवळ काळाचे एक मोजमाप आहे, आणि वास्तविकता ही आहे की अनेक वर्षे निघून चालली आहेत. आणखी एक वर्ष निघून गेले म्हणजे आणखी एका वर्षाचे ओझे कमी झाले. त्यामुळे तुम्हाला हायसे वाटायला नको का? तुम्ही येणारे वर्ष साजरे करू शकता, किंवा एक वर्ष संपले आणि वेळ वेळ निघून गेला म्हणून तुम्ही ते साजरे करू शकता; तुम्हाला तुमच्या आयुष्यात हाताळण्यासाठी एक वर्ष कमी शिल्लक राहिले.
आपण जीवनात किती तीव्रतेने गुंतलेले आहात यावर तुम्ही तुमचे जीवन मोजावे अशी माझी इच्छा आहे. 2019 हे वर्ष जीवनात गुंतलेले वर्ष होते का? का हे एक बंधन आहे? तुम्ही हेच मोजायला हवे, कारण मुळात जीवन आणि मृत्यू या दोनच गोष्टींविषयी तुम्हाला काळजी आहे. बाकी सर्व प्रासंगिक आहे.
“डेथ” हा इंग्रजी शब्द अतिशय नकारात्मक बनला आहे. लोकांना वाटते की ही एक भयानक गोष्ट आहे. एखाद्या भयानक गोष्टीला तुम्ही सामोरे जाऊ शकत नाही, होय ना? तुम्ही तुमच्या मनातील हा संदर्भ बदलून टाकायला हवा. मृत्यू म्हणजे काय याचा संदर्भ तुम्ही समजावून घेतलाच पाहिजे. तो जीवन- विरोधी नाही. केवळ मृत्युमुळेच जीवन घडत आहे. तुम्ही जर योग्य संदर्भ घेतलात, तर तुम्ही दोन्ही गोष्टींना सामोरे जाऊ शकता.
या सृष्टीच्या किंवा या पृथ्वीच्या इतिहासात, तुम्ही अगदी थोडया काळासाठी जीवंत आहात. उर्वरित काळात, तुम्ही मरण पावलेले आहात. त्यामुळे तुमची जन्माची शिक्षा फार मोठी नाही. तुम्ही जेवढा काळ मृत असणार आहात त्याच्या तुलनेत हा काळ खूपच कमी आहे. केवळ तुम्ही मोठ्या काळासाठी मृत असल्याने, सध्या तुम्ही चमकत आहात, पण तुमचे हे चमकणे केवळ तुम्ही पुन्हा एकदा खूप मोठ्या काळासाठी मृत पावणार आहात म्हणूनच शक्य आहे. “एका विरुद्ध दुसरं” ही मूर्खपणाची कल्पना आहे. मूलतः, जीवनाच्या सर्व स्तरांवर – मग ते पुरुषत्व असो आणि स्त्रीत्व, जीवन आणि मृत्यु, अंधार आणि प्रकाश, आवाज आणि शांतता – एक गोष्ट दुसर्या गोष्टीशिवाय असू शकत नाही. त्या एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांच्या विरोधी नाहीत.
सध्या तुम्ही एकूण काळाच्या, एका अतिशय कमी कालावधीसाठी जीवंत आहात, पण तुम्हाला फक्त या लहानशा कालावधीला कवेत घ्यायचे आहे आणि राहिलेल्या काळाला नाही – अस्तित्व अशा प्रकारे घडवलं गेलं नाहीये कारण हे सर्व एकच आहे. हा एक जिवंत मृत्यु आहे. इथे सदासर्वदा अशा प्रकारे जगायला हवं की जेणेकरून तुम्ही जीवन आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी निरंतर एकत्रितपणे अनुभवत आहात ही महत्वाची गोष्ट आहे. मृत्यु जगणे याचा हाच अर्थ आहे. तुम्ही मरण पावणार आहात म्हणूनच तुमचे जीवन मोलाचे आहे. तुम्ही जर कधीही मरण पावला नसता, तर तुम्ही या जीवनाकडे लक्ष दिले असते का? फक्त जे मृत्यु पावतात, तेच जीवंत रहातात.
जर तुम्हाला संधी मिळाली, तर एखाद्या व्यक्तीच्या अन्त्यसंस्कारासाठी जा. भारतात अशी संस्कृती आहे की जर तुम्हाला एखादा मृतदेह अग्निसंस्कार किंवा दफन करण्यासाठी नेताना दिसला, तर तुम्ही त्यासोबत किमान तीन पावले चालत जाणे अपेक्षित आहे, “मी तुमच्यासोबत आहे.” याचे हे प्रतीक आहे. असे करणे म्हणजे मृतदेहाबद्दल आदर आणि जे जीवंत आहेत आणि त्या व्यक्तीच्या जवळचे आहेत त्यांच्याबदल सहानभूती दर्शवणे होय.
मृत्यु हा पर्याय नाही – तो अटळ आहे. तो सृष्टीच्या इच्छेनुसार आहे. जीवन ही आपली निवड आहे. तुम्हाला जर ही निवड योग्य प्रकारे अमलात आणायची असेल, तर तुम्ही जीवनाची सर्व परिमाणे एकच आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तुम्ही फक्त हे आयुष्य स्वीकारले आणि ज्याने तुम्हाला निर्माण केले, जे तुमच्यासाठी प्राथमिक आहे, त्याचा स्वीकार केला नाहीत तर तुम्ही मूलतः जे आहात, तर मग तुमच्याकडे फारसे पर्याय उरत नाहीत; तुम्ही एक अनिवार्य शक्ती बनाल. तुम्ही जीवन सुद्धा मृत्युसारखेच जगाल– सर्वकाही जाणीवपूर्वक नव्हे तर अपरीहार्यपणे, निवडीनुसार नाही. तुमची निवड योग्य रीतीने अमलात आणण्यासाठी, तुम्ही पुर्णपणे सर्वसमावेशक बनणे अवश्यक आहे– तुम्ही जसे जीवनाला सामोरे जाता तसेच तुम्ही मृत्युला सामोरे जा; तुम्ही प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करा. योगामध्ये, प्रत्येक श्वासाकडे याच दृष्टीने पाहिले गेले आहे – श्वास म्हणजे जीवन आहे, तो एक जन्म आहे, आणि उच्छवास म्हणजे मृत्यु. जीवन आणि मृत्यु सदैव एका श्वासातच घडत असते– हे योगाचे लक्ष्य आहे. योगाचा अर्थ एकत्रीकरण असा आहे – की जीवन आणि मृत्यु तुमच्यात एकच झाले आहेत. तुमच्यासाठी या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, तुम्ही एक जीवंत मृत्यु आहात. जेंव्हा तुम्ही जीवंत मृत्यु असता, तेंव्हा त्याचे पर्यवसन एका सुंदर जीवनात होते, कारण मातीकडे दुर्लक्ष करून झाडाची वाढ होऊ शकेल का?
तुम्हाला जर खरोखरच जीवंतहोऊन जगायचे असेल, जिवंत जीवन या अर्थाने की तुम्ही तुमच्या अस्तित्वाचे अवघे मूळ स्वरूप तुम्ही ठरवता, असे असेल तर मग तुम्ही जीवंत मृत्यु बनणे, तुम्ही तुमचे संपूर्ण जीवन (जीवन-मृत्यू) एकच आहे हे समजावून घेणे महत्वाचे ठरेल. तुम्ही जर त्यांना वेगवेगळे केले, तर तुमच्या निवडीचा उपयोग करण्याची शक्ती तुमच्याकडे उरणार नाही, कारण तुम्हाला उभे राहण्यासाठी कोणताही आधारभूत पाया शिल्लक राहणार नाही. मृत्युच्या चिरंतन आधाराखेरीज, तुम्ही सध्या अनुभवत असलेले जीवन शक्यच नाही.
फक्त दोन्ही गोष्टींना जाणीवपूर्वक सामोरे गेल्यानेच, तुम्ही अतिशय आश्चर्यकारक जीवन जगू शकता, तुमचे अस्तित्व तुम्ही नेत्रदीपक बनवू शकता, तुम्ही या जगात काय करता यामुळे नाही, तर केवळ तुम्ही ज्या प्रकारे अस्तित्वात आहात त्यामुळे. तुम्ही स्वतःमध्ये ज्या प्रकारे जीवंत राहता ते नेत्रदीपक बनू शकते.
आपणा सर्वांसाठी येणारे नवीन वर्ष, 2020, एक नेत्रदीपक अनुभव बनो.
प्रेम आणि कृपा