तरुणाई आणि सत्य (यूथ अँड ट्रूथ) – जेव्हा गप्पा जागतिक बनतात
सद्गुरूंनी "यूथ अँड ट्रूथ" मोहिमेच्याचा उद्देश्याची विस्तृत माहिती देताना आजच्या युवकांशी निगडीत समस्यांचे तसेच, जर त्यांनी त्यांच्या उर्जेचा सकारात्मकतेने वापर केला तर त्यातून निर्माण होणाऱ्या मोठ्या शक्यतांचे वर्णन केले आहे.
या सप्टेंबरमध्ये, सद्गुरु भारतातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील युवकांशी संवाद साधणार आहेत, जेथे युवक आपल्या निवडीच्या कोणत्याही विषयांवर त्यांच्याकडून स्पष्टीकरण प्राप्त करू शकतील - कोणत्याही निर्बंधांशिवाय. या लेखात, सद्गुरूंनी "यूथ अँड ट्रूथ" मोहिमेच्या उद्देशावर प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि आजच्या युवकांशी संबंधित समस्यांविषयी तसेच त्यांनी त्यांच्या उर्जेचा सकारात्मकतेने वापर केला तर त्यातून निर्माण होणाऱ्या मोठ्या शक्यतांचे वर्णन केले आहे.
प्रश्न: देशाला प्रगतीच्या दिशेने कार्यरत ठेवण्याची शक्ती युवकांच्या हाती आहे. पण त्यांच्या दैनंदिन जीवनात आदर्शाचा अभाव आहे. आजचा युवक चिंतित, निराश आहे आणि त्याच्याकडे नोकरीची कमतरता आहे. तर युवकांना तुमचा सल्ला काय आहे?
सद्गुरु: युवक म्हणजे भविष्यातील मानवता होय. प्रौढ आणि वयस्क माणसांइतके ते गर्वी नसतात, म्हणून त्यांच्याकडे जगात नवीन शक्यता निर्माण करण्याची अजूनही संधी आहे. परंतु, जुनी पिढी आपल्यात कोणताही बदल करण्यास राजी नसताना, तरुण पिढीकडून काहीतरी चमत्कारिक करण्याची अपेक्षा करणे हे एक रिकामं स्वप्न आहे.साधारणतः युवकांचे स्वरूप असे असते की जरी त्यांच्याकडे उच्च उर्जा असली तरी ते प्रतिक्रियावादी असतात. म्हणून जर जुन्या पिढीने या ग्रहावरील योग्य, समजूतदारपणाचं जगणं कसं जगावं याबद्दल समज आणि प्रेरणा दाखवली नाही, तर युवक आपल्यापेक्षा अगदी वाईट कामगिरी करतील. म्हणून हे खूप महत्वाचं आहे की तुमचं वय कोणतंही असो, आपण युवाचैतन्याने भरून सुरवात करून त्यांना दाखवून देऊ शकता की तुम्ही परिवर्तन आणू शकता.
संभावनांचा उंबरठा
भारतातील 50% पेक्षा जास्त व्यक्ती युवक आहेत. अस्वस्थ, अलक्ष आणि अप्रशिक्षित 70 कोटी तरुण हे एक मोठ्या आपत्तीकरिता एक आमंत्रणच आहे. पण जर हेच 70 कोटी तरुण स्वस्थ, एकाग्र आणि प्रशिक्षित असतील तर हि एक प्रचंड संभावना होऊ शकते.
सध्या हा देश एका विलक्षण संभावनेच्या उंबरठ्यावर उभा आहे. पिढ्या न पिढ्या लोक त्याच त्याच परिस्थितीमध्ये जगत आले आहेत. आता, पहिल्यांदाच आम्ही मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला एका पातळीवरून दुसऱ्या पातळीवर घेऊन जाऊ शकतो.
जितक्या उत्तमरीतीने आपण युवकांसाठी सोयीस्कर परिस्थिती निर्माण करू त्यानुसार आपण ही शक्यता कशा प्रकारे पूर्ण प्रमाणात वापररु हे ठरविले जाईल. ते किती स्वस्थ आहेत, ते किती एकाग्र आहेत, किती प्रशिक्षित आणि सक्षम आहेत यावर देशाचा दिशा निर्देश ठरेल.
"यूथ न ट्रूथ" चा शुभारंभ
युवक एकतर भयंकर विनाश करू शकतात किंवा त्यांच्याकडे ऊर्जेचा सकारात्मक आणि रचनात्मक वापर करण्याचं आवश्यक ते स्थैर्य असेल, तर ते मोठी कामगिरी करू शकतात. आज जगात युवकांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची गोष्ट व्हायची आहे ती म्हणजे त्यांनी ध्यानमय बनणे आवश्यक आहे. मग ते शैक्षणिक क्षेत्रात असोत, व्यावहारिक प्रशिक्षणात असोत किंवा आयुष्यात आपल्या इच्छेनुसार हवं ते करोत, जर ते आपल्या जीवनात जरा अधिक स्थिर बनले तर आपणा ज्या शक्तीला युवक म्हणतो त्या शक्तीचा त्यांच्या स्वत: च्या भल्यासाठी आणि इतरांच्या भल्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो.
याच दिशेचे एक पाऊल म्हणून आम्ही "यूथ अँड ट्रूथ" - आपल्या युवाशक्तीला प्रेरित करण्यासाठी व सशक्त करण्यासाठी एक राष्ट्रीय मोहीम सुरु करीत आहोत. या मोहिमेचा शुभारंभ 3 सप्टेंबर रोजी होईल आणि विविध राज्यांतील मोठ मोठी विद्यापीठे आणि संस्थांमधील विद्यार्थ्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत, त्यांना त्यांच्या समस्येबद्दल प्रश्न विचारण्यासाठी आमंत्रित करणार आहोत आणि त्यांच्या कल्याणासाठी त्यांना सोपी साधने प्रदान करणार आहोत.
गप्पांचे जागतिकीकरण
यात सगळ्या गप्पाच असणार आहेत! अगदी प्राचीन काळापासून, जेव्हा एखाद्याला एखाद्या गोष्टीचं सत्य जाणून घ्यायचं असे, तेव्हा ती व्यक्ती प्रचलित असेल्या अधिकृत माहितीवर नव्हे, तर नेहमी गप्पांवर अवलंबून असत. वृत्तपत्रांमध्ये काही बातमी प्रकाशित होते त्यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही, तुम्ही शेजाऱ्यांकडे चौकशी करता. कोणीतरी काहीतरी सांगतो आणि तेच सत्य बनते. म्हणून गप्पा नेहमीच सत्याचे संदेशवाहक आहेत, धार्मिकग्रंथ नव्हेत. गप्पांमध्ये अतिशयोक्ती केली जाते आणि त्या बहुविध होतात, पण लोकांना गप्पांना कशा प्रकारे ऐकावं आणि त्यांची छाननी करून त्यातून सत्य कसं बाहेर काढावं हे माहित असतं.
सोशल मीडियाच्या आगमनानंतर, गप्पा जागतिक पातळीवर पोहोचल्या आहेत. त्या आता फक्त स्थानिक गप्पा राहिल्या नाहीत. म्हणून मी विचार केला की आपण त्यांना पुढच्या पातळीवर नेऊ या. जेव्हा तुम्ही एका योगी, द्रष्ट्याशी गप्पा मारता तेव्हा आपल्या गप्पा वैश्विक होतात.
लोक मला म्हणत राहतात, " सद्गुरु, मी पंचवीस वर्षांचा असताना जर तुम्हाला भेटलो असतो तर मी पुष्कळ काही केलं असतं." म्हणून मी विचार केला की आम्ही तरुणांमध्ये सामील होऊ या आणि बघू या की आपण त्यांना सत्याच्या किती जवळ नेऊ शकतो.
जीवन जरा नागमोडी वळणानं जात असतं, परंतु सत्य मात्र सरळ रेषेप्रमाणे आहे. प्रश्न केवळ हा आहे तुम्ही सत्याच्या किती जवळ आहात? एका दिवसात किंवा तुमच्या आयुष्यात त्याला किती वेळा स्पर्श करता? हेच तुमच्या जीवनाची गुणवत्ता, अनुभव आणि प्रगल्भता निर्धारीत करेल. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही त्याला स्पर्श कराल, तेव्हा तुमच्यामध्ये काहीतरी अभूतपूर्व घडेल जे तुम्हाला कार्यरत ठेवेल.