महाभारत भाग १२: कौरव बांधव - वाईट चिन्हाखाली जन्म
या महाभारत भागात आपण धृतराष्ट्राच्या १०० पुत्रांच्या जन्माभोवती होणारा अशुभ देखावा पाहणार आहोत.ऋषीमुनिंचे शहाणपण आणि झालेल्या शकुनाकडे दुर्लक्ष करून गांधारी आणि तिचे पती यांनी नागाचे डोळे असलेल्या त्यांचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधनाचा त्याग केला नाही.
सद्गुरु: धृतराष्ट्र जन्मतः आंधळा होता - त्याची पत्नी गांधारी निवडीने अंध झाली होती. आपल्या भावांच्या बायकांना मुलं होण्यापूर्वीच तिला मूल होण्यासाठी तो आतुर होता, कारण नवीन पिढीतील पहिला मुलगा राजा झाला असता. त्याने गांधारीच्या कानात सर्व प्रकारच्या प्रेमाच्या गोष्टी सांगितल्या जेणेकरुन तिला मुलगा होईल. गांधारी गर्भवती झाली. एका पाठोपाठ महिने जाऊ लागले, नऊचे दहा झाले, अकरा झाले - तरीही प्रसूती झाली नाही. ते चिंताग्रस्त झाले. मग त्यांना बातमी मिळाली - पंडुचा पहिला मुलगा युधिष्ठिराचा जन्म झाला. धृतराष्ट्र आणि गांधारी नैराश्यात गेले.
एक अशुभ जन्म
युधिष्ठिर पहिला जन्मला होता, नैसर्गिकरित्या तो राजा झाला असता. अकरा, बारा महिने गेले, आणि गांधारी अजूनही प्रस्तुत झाली नाही. ती म्हणाली, “हे काय आहे? हा मृत आहे की जिवंत आहे? हा मनुष्य आहे की हा पशू आहे? ” निराश होऊन तिने तिच्या पोटाला मारहाण केली, परंतु काहीही झाले नाही. मग तिने तिच्या एका सेवकाला काठी घेऊन यायला सांगितले आणि तिच्या पोटाला मारहाण केली. यानंतर, तिचा गर्भपात झाला, आणि मांसाचा एक काळा तुकडा बाहेर आला. जेव्हा लोकांनी हे पाहिले तेव्हा ते भयभीत झाले कारण ते मानवी देहांसारखे नव्हते - त्याबद्दल काहीतरी वाईट आणि अपवित्र आहे.
अचानक, हस्तिनापूर शहर भयभीत झाले कारण त्यांना भयानक आवाज ऐकू आले - कोल्हे ओरडू लागले; रानटी प्राणी रस्त्यावर फिरु लागले; दिवसा वटवाघळं उडत होती. काहीतरी चुकीचे होणार आहे याची चिन्हे स्पष्ट दिसत होती. हे पाहणाऱ्या ऋषींनी हस्तिनापूरकडे पाठ फिरविली. सर्व ऋषी सोडन गेले ही बातमी पसरली. विदुराने येऊन धृतराष्ट्रला सांगितले, "आपण मोठ्या संकटाकडे जात आहोत." धृतराष्ट्राला मूल होण्याची इतकी चिंता होती की तो म्हणाला, “ते सोड.” आणि तो पाहू शकत नसल्यामुळे त्याने विचारले, “काय झाले? प्रत्येकजण का ओरडत आहे, आणि हे सर्व काय आवाज आहेत?”
१00 भांडी, १00 मुलगे
मग गांधारी व्यासांना बोलावते. एकदा, ऋषी व्यास लांब प्रवासातून आले होते आणि गांधारीने त्यांच्या जखमी पायांची आणि त्यांची खूप काळजी घेतली होती, तेव्हा त्यांनी तिला वचन दिले होते, "तुला जे हवे असेल ते मी तुला देईन." ती म्हणाली होती, "मला १०० मुले पाहिजे." तो म्हणाला होता, “छान, तुला १०० मुलगे होतील.” आता, गर्भपातानंतर तिने व्यासाना बोलावून विचारले, “हे काय आहे? तूम्ही मला १०० पुत्रांचा आशीर्वाद दिला होता, परंतु त्याऐवजी मी मासाच्या तुकड्याला जमीन दिलाय जो मानवही दिसत नाही - ते काहीतरी वेगळंच आहे. त्याला जंगलात टाकून द्या. त्याला कुठेतरी दफन करा.”
व्यास म्हणाले, “आतापर्यंत मी जे काही बोललो ते कधीही चुकीचे ठरले नाही किंवा आता ते चूक होणार नाही. तो तुकडा आणा. ” त्यांनी ते तळघरात नेले आणि १०० मातीची भांडी, तीळाचे तेल आणि विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आणण्यास सांगितले. त्यांनी ह्या मांसाच्या तुकड्याचे १०० तुकडे केले आणि त्यांना भांड्यांमध्ये ठेवले आणि भांडी बंद करून आणि त्यांना तळघरात ठेवले. तेव्हा त्यातला एक छोटासा तुकडा त्यांना बाकी दिसला. तो म्हणाला, “मला आणखी एक भांडे आण. तुला १०० मुलगे आणि एक मुलगी असेल. ” त्याने हा छोटा तुकडा अतिरिक्त भांड्यात ठेवला, त्याला बंद केले आणि तळघरात ठेवले. अजून एक वर्ष गेलं. म्हणूनच असे म्हणतात की गांधारी दोन वर्ष गर्भवती होती - एक वर्ष तिच्या गर्भात, एक वर्ष तळघरात.
सापाच्या डोळ्यांचा मुलगा
एक वर्ष संपल्यानंतर, पहिले भांडे फुटले आणि त्यातूनच सर्पाच्या डोळ्यांचा एक प्रचंड मुल बाहेर निघाले. याचा अर्थ असा की त्याने डोळे मिचकावले नाहीत - त्याचे डोळे स्थिर, न पाहणारे आणि सरळ होते. पुन्हा एकदा, अशुभ आवाज आणि चिन्हे आली; रात्री काय घडले पाहिजे ते दिवसा घडले. अंध धृतराष्ट्राला वाटले की काहीतरी चूक आहे आणि विदुराला विचारले, “काय होत आहे? काहीतरी चूक आहे. माझा मुलगा जन्मला आहे का? कृपया मला सांग. ” विदुरा म्हणाला, “हो, तुला मुलगा आहे.” हळू हळू, इतर सर्व भांडी उबणे सुरू झाले - सर्व मुले बाहेर आले आणि एका भांड्यातून एक लहान मुलगी.
विदुर म्हणाला, “तुला १०० मुलगे आणि एक मुलगी आहे. पण मी सांगतो - तुझ्या पहिल्या मुलाला मारून टाक. ”धृतराष्ट्र म्हणाला, “काय, तू माझा पहिला मुलगा मारायला सांगितोस? ते कसे शक्य आहे? ” विदुर म्हणाला, “जर तुझा पहिला जन्मलेला मुलगा मारला गेला तर तू स्वत:ची, कुरु कुळाची आणि माणुसकीची सेवा करशील. आणि तरीही तुझ्याकडे १०० मुले - ९९ मुलगे आणि एक मुलगी आहे. या ज्येष्ठाशिवाय ते निरुपद्रवी असतील. त्याच्यासोबत हे आपल्याला माहिती असणाऱ्या जगाचा नाश करणार आहेत.”
दुर्लक्षित अपशकुन
त्यादरम्यान, गांधारीने त्यांचा पहिला मुलगा दुर्योधन याला उचलले. तिने हे सर्व आवाज ऐकले नाहीत. तिला हे सर्व अपशकुन जाणवले नव्हते. तिला आनंद झाला होता की तिचा पहिला मुलगा जन्मला - एक प्रचंड बाळ. त्याचे पालनपोषण आणि त्याला वाढवण्यासाठी ती उत्सुक होती. मग विदुर म्हणाला, “शहाण्या लोकांनी नेहमीच असे म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीचा त्याच्या कुटुंबाच्या भल्यासाठी बलिदान दिले जाऊ शकते, एखाद्या कुटुंबाचा गावाच्या चांगल्यासाठी, एखाद्या गावाचा देशाचे भले व्हावे यासाठी. एखाद्या अमर आत्म्यासाठी जगाचे बलिदान दिले जाऊ शकते.”
“अरे, माझ्या भावा, तुझे हे राक्षसी मूल नरकाच्या तळातून मानवजातीला भ्रष्ट आणि नाश करण्यासाठी आले आहे. त्याला मार. मी शपथ घेउन सांगतो, त्याचे भाऊ निरुपद्रवी असतील आणि तू त्यांबरोबर सुखी होऊ शकतोस - ९९ राजकुमार! परंतु, तू त्याला जिवंत ठेवू नकोस. ” परंतु धृतराष्ट्राला स्वतःचे मांस आणि रक्त ह्यांची ओढ त्याच्या शहाणपणापेक्षा मोठी होती. मग हस्तिनापूरच्या राजवाड्यात दुर्योधन आपल्या १०० भावंडांसह मोठा झाला, तर पांडव जंगलात मोठे झाले.
यानंतर पुढे....