स्वतःच्या कार्य-कौशल्यावर आणि विकासावर शंका - कसं हाताळावं
रेजिना कॅस्सांड्रा सद्गुरूंना विचारतीये की तरुण मुलं-मुली स्वतःवर शंका घेण्यापासून कसे मुक्त होऊ शकतील.
रेजिना कॅस्सांड्रा: मला वाटत की खुप मुलांना आणी मोठ्यांना ही , माझ्या डोक्यात कित्येक प्रश्न घोळत असतात स्वत:बद्दल, माझ्या कुवतीबद्दल आणी माझ्य़ा क्षमतेबद्दल. स्वत:वर संशय हे नक्कीच एक… एक अशी समस्या आहे जिचा कदाचित मी सामना करून त्यातून बाहेर पडलेय. पण मला याबद्दलचा तुमचा दृष्टीकोन जाणुन घ्यायला आवडेल. कुणाला स्वत:वर संशय घेण कस थांबवता येईल. खासकरून एखाद्या तरूणाला.
सदगुरू: नमस्कार रेजिना! मला माहितेय की प्रत्येकजण तुम्हाला सांगत असतो, “स्वत:वर विश्वास ठेवा, स्वत:वर विश्चास ठेवा”! मी म्हणेन, “कृपया स्वत:वर शंका घ्या.” तुमच्या आयुष्यात जे ही चुक किंवा बरोबर घडत असेल, सर्वप्रथम हे पहा की कदाचित मीच याच कारण आहे. अगदी काळजीपुर्वक याकडे पहा. जर ते तुम्ही नसाल, तर आपण इतरांकडे पाहू शकतो. काही तथाकथित आत्मविश्वासी मूर्ख प्रत्येकाच्या सर्व गोष्टींवर पाय देऊन चालताहेत.
व्यक्ती विकासाच्या वेदना!
जेव्हा आपण वाढ म्हणतो, तेव्हा मनुष्याच्या बाबतीत अनेक पैलू आहेत. शारिरिक वाढ असते, मानसिक वाढ असते, भावनिक आणी इतर प्रकारची वाढ असते मनुष्याच्या जीवनात. बरेचदा आपण फक्त शारिरिक वाढ मोजतो, आणी फारफारतर मानसिक वाढ. जीवनाचे इतर पैलू आपण तेव्हाच उलगडू लागतो जेव्हा आयुष्यात आपला अवघड अडचणींशी सामना होतो. आपला भावनिक आणि उर्जेच्या विकास तसेच एक व्यक्ती म्हणून अस्तित्वाचा विकासाचा स्तर तेव्हाच कळू लागतो जेव्हा आयुष्य अगदी अवघड परिस्थितींशी आपला सामना करवतं. आयुष्याच्या अशा परिस्थितीत आपल्या स्वतःच्या प्रतिक्रिया पाहून बहुतेक लोकाना आश्चर्य होतं.
हे पहा शरीर हे… अतिशय मूर्त घटक आहे, ते एका विशिष्ट वेगाने वाढतं. काही लोकांना मधे जरा कमी अधिक वेगानं पण तरी एका विशिष्ट गतीनं होते. पण मानसिक स्तरावर तुम्ही कोण आहात ही काही मुर्त प्रक्रिया नाहिये. ही एक अमुर्त प्रक्रिया आहे, अधिक लवचिक, अधिक हालचालींची किंवा अस्पष्ट, म्हणुन तिची वाढ आपल्या शारिरिक प्रक्रियेच्या आधी होऊ शकते. जर लोकांना वाढताना समस्या येत असतील, तर त्याच मुख्य कारण म्हणजे, त्यांची मानसिक वाढ त्यांच्या शारिरिक वाढीच्या कमीतकमी एक पाऊलही पुढे नाहिये.
तर, जरी त्याच गोष्टी ह्या ग्रहावरील अरबो लोकांसोबत सदैव घडल्या, तरीही ते त्यांना वाटतं की विश्वात अगदी पहिल्यांदाच घडत आहे आणी ते आश्चर्यचकित होतात आणी त्यांना धक्का बसतो आणी बरंच काही. हे फक्त यामुळे आहे की त्यांची मानसिक वाढ त्यांच्या शारिरिक वाढीच्या तुलनेत मंद आहे.
हे अतिशय महत्वाचंये की आपण समाजात अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे जिथं प्रत्येक मुलाची मानसिक वाढ त्याच्या शारिरिक वाढीच्या निदान एक पाऊल पुढे असेल. जर तुम्ही हे केलंत…फक्त ही एक गोष्ट केली तुमच्या आयुष्यात, तुम्ही पाहाल की भले किशोरावस्था असो की मध्यम वय असो की म्हातारपण असो, तुम्ही कशानेही आश्चर्यचकित होणार नाही, तुम्हाला ते कसं हाताळायचं ते माहित असेल, ते कसं निस्तरायचं ते माहित असेल, आणी जीवनातल्या साध्या सोप्या गोष्टींसाठी तुम्ही गोंधळणार नाही.
आजकाल लोक अशाप्रकारे जगत आहेत की लहान मुलांना डायपरच्या समस्या आहेत, किशोर वायातल्यांना हार्मोन्सच्या समस्या आहेत, मध्यम वयस्कांना मध्यमवयीन , काय म्हणतात त्याला…मिडल एज क्रायसिस, म्हातारे लोक अर्थातच, त्रस्त आहेत. मला जीवनातली एकतरी अशी गोष्ट सांगा जिज्याकडे लोक समस्या म्हणुन पाहत नाहीयेत. जीवन म्हणजे एक समस्या नव्हे, जीवन ही एक ठराविक प्रक्रिया आहे. प्रश्न केवळ हा आहे की तुम्ही या प्रक्रियेसाठी स्वत:ला तयार केलंय किंवा नाही?
संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugWithSadhguru.org वर.