गुरु पादुका स्तोत्र – शब्दरचना आणि ऑडिओ डाऊनलोड सोबत
गुरु पादुका स्तोत्र हे गुरुकृपा प्राप्तीसाठी ग्रहणशील होण्यासाठीचा एक शक्तीशाली मंत्रघोष आहे. ते आम्ही या ठिकाणी निशुल्क MP3 डाऊनलोड आणि अँड्रॉइड ऍप्प मधून उपलब्ध केले आहे.
गुरु पादुका स्तोत्र हे “गुरूंच्या पादुकांचे” गौरव गाणारा एक शक्तीशाली मंत्र असून, त्या “जीवनाचा अनंत भवसागर तरून जाण्यासाठी एक नाव” याचे एक प्रतीक आहे. हा मंत्रघोष कोणालाही गुरु कृपेप्रती ग्रहणशील बनवितो.ईशा ब्रम्हचारीगणांनी गायलेला हा मंत्र; वैराग्य अल्बमचा एक भाग म्हणून प्रकाशित केला असून तो नि:शुल्क डाऊनलोड करता येतो. तसेच ते ईशा चॅन्टस अॅपचा एक भाग म्हणून देखील उपलब्ध आहे. त्याखाली संस्कृत शब्दरचना सुद्धा दिलेली आहे.
सद्गुरु: आयुष्यात जर कृपा नसेल, किंवा आपण कृपेप्रती ग्रहणशील नसाल, तर आपल्याकडे किती धन दौलत आहे, किती संपत्ती, मौल्यवान गोष्टी आहेत, ज्याकाही व्यर्थ, निरर्थक गोष्टी मिळवल्या असतील, तरी तुम्ही एक सुंदर जीवन जगू शकणार नाही. गुरुकृपा ही काही परीकथेत कल्पना करण्याजोगी गोष्ट नाहीये. ती एक अगदी वास्तविक, भौतिक, अनुभवात्मक उपस्थिती आहे. ज्याप्रमाणे आपण हवेची वास्तविक भौतिक उपस्थिती अनुभवतो अगदी तशीच. सूर्यप्रकाशा सारखीच अगदी वास्तविक, भौतिक.
आपण ज्याला गुरु म्हणून संबोधतो, ती केवळ एक विशिष्ट ऊर्जा, एक निश्चित शक्यता आहे. ती काही कुणी एक व्यक्ती नाही. हो! एखादी विशिष्ट व्यक्ती त्या ऊर्जेची आणि अवकाशाची प्रतिनिधी बनलेली आहे. समजा, जर तुम्हाला पहायचे असेल, तेव्हा तुम्हाला प्रकाशाची गरज असते, प्रकाश देणार्या बल्बची नाही. परंतु सध्या तो प्रकाशाचा विशिष्ट दिवाच प्रकाशाचा स्त्रोत बनला आहे. म्हणून तुम्ही असा विचार करता, “मी प्रकाशाच्या दिव्याशिवाय जगू शकत नाही.” एका पातळीवर हे सुद्धा सत्य आहे. परंतु गुरुचे स्वरूप फक्त काळ आणि अवकाश येवढ्यापुरते मर्यादित नाही. तुम्ही प्रकाशाच्या दिव्याशेजारी बसता म्हणून तुम्हाला सर्वाधिक उजेड मिळतो असे नाही. तुम्ही हजारो मैल दूर असूनसुद्धा सध्या त्या व्यक्तीच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीपेक्षा अधिक कृपा प्राप्त करून घेऊ शकता.
कृपा असल्यशिवाय तुम्हाला खरे यश लाभणार होणार नाही. म्हणून तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने कृपा ग्रहण करून घेणे शिकावेच लागेल. केवळ तुमची मानसिक अवस्थासुद्धा तुम्हाला ग्रहणशील बनवु शकते, तुम्ही तुमचे शरीर कोणत्या पद्धतीने ठेवता त्याने तुम्ही ग्रहणशील बनू शकता, तुम्ही तुमच्या भावना ज्याप्रकारच्या स्थितीत ठेवता, त्यामुळे तुम्ही ग्रहणशील बनू शकता, किंवा आपण इतर कोणतीही अधिक गुंतागुंतीच्या पद्धती वापरत असाल, ती कशी कार्य करते याची समज आहे म्हणून तुम्ही ग्रहणशील बनता. पण कृपा असल्याखेरिज यश मात्र लाभणार नाही. तुम्ही कदाचित अतिशय बुद्धिमान असाल, पण तरीसुद्धा तुम्ही एक असफल व्हाल. तुमच्यात कदाचित प्रचंड क्षमता, कौशल्य असेल,पण तरीसुद्धा असफल असाल.
पण कृपेचा एक क्षण, आणि अचानकपणे तुम्ही पहाल सर्वकाही यशस्वी होत चाललंय. तुम्ही समाधानी असण्यासाठी, तुम्ही आनंदी असण्यासाठी, या गोष्टी तुम्ही तुमच्या आतून घडवू शकता. तुमचे शरीर आणि मन कसे हाताळावे याची माहिती जर तुम्हाला असेल, तर तुम्ही या गोष्टी साध्य करू शकता. पण कृपा असल्याशिवाय तुम्ही करत असलेली गोष्ट यशस्वी होणे शक्य नाही. कृपेचं वंगण असल्याशिवाय तुमची मोटार फार अंतर चालू शकणार नाही. तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट म्हणजे अवघड, कठीण बनून बसेल. बहुतेक लोक स्वतःच त्यांच्यावर अशी परिस्थिती ओढवून घेतात कारण आपल्याच अहं विश्वात ते गर्क असतात. ते कृपेसाठी पात्र होणार नाहीत. त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट कठीण परिश्रम होऊन बसते– शिक्षण घेणे अवघड होते, कामाला जाणे अवघड होते, विवाहित जीवन ही एक मोठी समस्या बनते. पण जर तुम्ही कृपेप्रती प्रचंड ग्रहणशील बनलात, तर तुम्ही पहाल की प्रत्येक गोष्ट अतिशय सहज, विनासायास घडते आहे कारण आता तुम्ही कृपेचा वरदहस्त लाभलेली आसामी आहात.
Isha Chants – Free Mobile App
Vairagya - mp3 download
अनंत संसार समुद्र थार नौकायीधाभ्यां गुरु भक्तीथाभ्यां, वैराग्य साम्राज्य ध पूजनाभ्यां नमो नमः श्री गुरु पादुकाभ्यां
कवित वाराशीनी सागराभ्यां दौर्भाग्य दावांबुध मालिकाभ्यां धुरीकृतानां विपतिताभ्यां नमो नमः श्री गुरु पादुकाभ्यम.
नता ययो श्रीपतीताम समियू कदाचिदभ्याशु दारिद्र्य वर्य मुकाश्च वाचस्पतीताम हीताभ्यां, नमो नमः श्री गुरु पादुकाभ्यम.
नालिकनिकाश पदा ह्र्रीधाभ्यां नाना विमोहादि निवारिकाभ्यां नमजनाभीष्ठतथी प्रधाभ्यां नमो नमः श्री गुरु पादुकाभ्यम.
नृपाली मौली ब्रज रत्न कांती, सरीद्वी राज्यशकन्यकाभ्यां नृपदवदाभ्यं नथलोक पंक्तेहे, नमो नमः श्री गुरु पादुकाभ्यां.
पापांधकारर्क परंपराभ्यं तापथ्रयाहिंद्र खगेश्वराभ्यां जाड्याब्धी संसोशडवाडव्याभ्यां, नमो नमः श्री गुरु पादुकाभ्यां.
समाधी शडगं प्रध वैभवाभ्यां, समाधी धानं व्रत दीक्षिताभ्यां रमाधवांग्री स्थिर भक्तिदाभ्यां, नमो नमः श्री गुरु पादुकाभ्यां.
स्वःचापराणाम अखिलेष्ठधाभ्यां स्वहा सहायक्ष दुरंदराभ्यां स्वान्तचः भाव प्रद पूजनाभ्यां, नमो नमः श्री गुरु पादुकाभ्यां.
कामाधी सर्प व्रज गारुडाभ्यां, विवेक वैराग्य निधी प्रदाभ्यां बोध प्रदाभ्यां द्रुत मोक्षताभ्यां, नमो नमः श्री गुरु पादुकाभ्यम.