सद्गुरु: जशी तुमची सजगता आवश्यक तेवढी तीक्ष्ण किंवा धारदार बनते, तेंव्हा सर्वप्रथम अगदी सहजतेने होणारी जाणीव म्हणजे तुमचा श्वास. श्वासोच्छवास ही शरीरात अविरत आणि सतत सुरू असणारी यांत्रिक क्रिया असल्याने, बहुतांश व्यक्ती त्याप्रती सजग न राहताच कसे जगतात हे एक मोठे आश्चर्यच आहे. परंतु एकदा का श्वासाची जाणीव आपल्याला व्हायला लागली, की मग ती प्रक्रिया सुंदर बनते. आणि म्हणूनच श्वासावर लक्ष केन्द्रित करणे ही आज जगातील ध्यान धारणेच्या प्रक्रियांमधील सर्वात अधिक अभ्यासली जाणारी साधना आहे. ती इतकी प्राथमिक आणि सोपी आहे, आणि ती इतक्या सोप्या पद्धतीने आणि नैसर्गिकरीत्या घडते, त्यामुळे त्यासाठी कोणती तयारी करायला लागत नाही.

आपण जर थोडे अधिक सजग बनलात, तर श्वास तुमच्या जाणिवेत अगदी सहजगत्या येईल. मी श्वासाचा आनंद लुटायला सुरुवात केली तेंव्हा मी सहा किंवा सात वर्षांचा होतो. केवळ माझ्या छातीच्या आणि पोटाच्या सतत सुरू असणार्‍या त्या हालचालीकडे लक्ष देण्यात माझे अनेक तास आनंदात पार पडत. त्यानंतर कितीतरी काळानंतर ध्यानधारणेची कल्पना माझ्या जीवनात आली. परंतु आपण जर थोडे सगज राहिलात, तर आपण अवीरत सुरू असलेल्या श्वासाच्या सोप्या लईकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

केवळ माझ्या छातीच्या आणि पोटाच्या सतत सुरू असणार्‍या त्या हालचालीकडे लक्ष देण्यात मी तासनतास व्यस्त असायचो.

बहुतांश लोकांचे त्यांच्या श्वासकडे तेंव्हाच लक्ष जाते जेंव्हा त्यांना दम्याचा झटका येतो किंवा धाप लागते. त्यांचे सर्वसामान्य श्वासाकडे लक्षच नसते, कारण त्यांना लक्ष केन्द्रित करण्याची गंभीर समस्या असते. हल्ली लोक त्यांच्यातील लक्ष न देता येण्याची असलेली कमतरता एखाद्या
पात्रतेसारखी मिरवत असतात.

जीवनात सजगता बाणा!

आपण आपल्या जीवनात, आणि विशेषतः आपल्या मुलांच्या जीवनात लक्ष देणे हे सर्वात महत्वाचे आहे. अखेर ते आध्यात्मिक असो किंवा ऐहिक, जगाकडे जेवढे तुम्ही लक्ष देता, तेवढेच तुम्ही त्याच्यावर ताबा मिळवू शकता.

श्वसनक्रिया ही अतिशय यांत्रिक प्रक्रिया आहे. एका सूक्ष्म प्रकारे, प्रत्येक वेळेस आपण जेंव्हा श्वास आणि उच्छ्वास घेतो, तेंव्हा शरीराला एक झटका बसत असतो. तुम्ही तुमच्या मानसिक कल्पना चौकटीत हरवून गेल्याखेरीज तुम्ही त्याकडे कसे दुर्लक्ष करू शकता?

श्वसन क्रियेवर लक्ष केन्द्रित करणे म्हणजे श्वसन मुद्दाम क/रण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. परंतु तो आपल्याला सजग बनविण्याचा एक मार्ग देखील आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करु नये, याउलट तुमच्या सजगतेची तीव्रता इतकी वाढवा की स्वाभाविकपणे तुम्ही तुमच्या श्वासाप्रती सजग व्हाल. श्वसनक्रिया ही अतिशय यांत्रिक प्रक्रिया आहे. एका सूक्ष्म प्रकारे, प्रत्येक वेळेस आपण जेंव्हा श्वास आणि उच्छ्वास घेतो, तेंव्हा शरीराला एक झटका बसत असतो. तुम्ही तुमच्या मानसिक कल्पना चौकटीत हरवून गेल्याखेरीज तुम्ही त्याकडे कसे दुर्लक्ष करू शकता? तुम्ही तुमचे विचार आणि भावना यामध्ये पूर्णपणे हरवून गेलेले नसाला, सहज एका ठिकाणी
खाली बसलात तर ही प्रक्रिया दुर्लक्षित होण्याचे कोणतेही कारण नाही. आपल्या जाणीवेत काहीतरी सामावून घेणे ही काही एक प्रकारची कृती नव्हे. यासाठी कोणतेही सायास लागत नाहीत.

जेंव्हा आम्ही एखादी विशिष्ट प्रक्रिया शिकवतो, तेंव्हा कदाचित आम्ही लोकांना त्यांच्या श्वासावर लक्ष केंद्रीत करायला सांगू कारण आवश्यक तितकी सजगता त्यांच्यात नसते. अन्यथा आपण केवळ नुसते बसले असाल, आणि आपल्या विचारांमध्ये हरवून गेले नसाल, तर श्वासाची जाणीव न होण्याचे कोणतेही कारण नाही. म्हणून तुम्ही स्वतःच्याच विचारांमध्ये हरवून जाऊ नका – त्याला फारसे महत्व नाही, कारण ते अतिशय मर्यादित माहितीच्या आधारे निर्माण होत असतात. त्यासोबत राहिलात, तर श्वास एका मोठ्या संधीचे प्रवेशद्वार बनु शकेल. सध्या, खुद्द श्वसनाची प्रक्रियाच बहुतांश लोकांच्या जाणिवेत नसते. ते फक्त त्यांच्या नाकातून किंवा फुफ्फुसातून होणार्‍या हवेच्या हालचालीमुळे होणार्‍या संवेदनांप्रती जागरूक असू शकतात. 

जर तुम्ही अगदी स्थिर होवून केवळ जर नुसते खाली बसलात किंवा आड पडलात, तर श्वसन क्रिया ही प्रचंड मोठी, आणि निरंतर आपोआप चालणारी प्रक्रिया बनेल. बहुतांश व्यक्ती या जाणीवे रहित कसे जीवन व्यतीत करू शकतात हे खरोखरच मोठे आश्चर्य आहे. श्वासावर लक्ष केन्द्रित करणे हा तेथपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे. आपल्यापैकी त्यांना शून्याची दीक्षा दिलेली आहे, त्यांना असेल लक्षात येईल की तुम्ही काहीही न करता केवळ येथे बसलात, तर अचानकपणे तुमच्या लक्षात येईल श्वसन क्रिया प्रचंड मोठी प्रक्रिया आहे. श्वसन ही खरोखरच एक अतिशय मोठी विलक्षण गोष्ट आहे, आणि ते गमावल्याखेरीज त्याचे महत्व तुमच्या लक्षात येणार नाही.

 

तुम्ही कदाचित भज गोविंदम हा श्लोक ऐकला असेल, त्यामध्ये "निश्चल तत्वम, जीवन मुक्ती" असा उल्लेख आहे. याचा अर्थ असा आहे, की जर एखाद्या गोष्टीकडे अविरत लक्ष केन्द्रित केले, मग ती कोणतीही गोष्ट असो, तेंव्हा आपल्यापासून मुक्ती, किंवा बंधनमुक्तीची संधी हिरावून घेता येत नाही. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाले, तर मनुष्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे लक्ष केंद्रित करण्याचा अभाव. संपूर्णपणे लक्ष देण्याची इच्छा असेल, तर आपण या विश्वातील कोणतेही दार आपल्यासाठी उघडू शकते. पण हे सर्व तुमचे लक्ष किती तीव्र आहे, आणि तुमचे लक्ष देण्यामागे किती ऊर्जा आहे यावर अवलंबून आहे. त्या संदर्भात, श्वसन क्रिया हे एक सुंदर साधन आहे, कारण जोपर्यंत आपण जीवंत आहोत, तोपर्यंत ते सदैव सुरूच असते. श्वसन सदैव सुरू असते. आपण केवळ त्याबद्दल सजग राहिले पाहिजे.

Editor’s Note: Sadhguru offers Isha Kriya, a free, online guided meditation that helps bring health and wellbeing. Daily practice of this simple yet effective 12-minute process can transform one's life. Isha Kriya is available for free on Sadhguru App. Download the Sadhguru App now!