अपेक्षांच्या पलीकडील नाती
नाते हे कसेही-कुठल्या ही प्रकारचे असोत, पण महत्वाचा घटक हाच आहे की त्या नात्यात तुमची गरज पूर्ण होते. “नको...मला माझ्यासाठी काहीही नको, मला फक्त इतरांना द्यायचय.” “देणे” हा गुण सुद्धा “घेणे” या सारखाच गरजेचा भाग आहे. “मला कुणाला तरी काहीतरी द्यायचं आहे” ही भावनासुद्धा “मला काहीतरी मिळवायचं आहे” या सारखीच गरजेचा भाग आहे. ही गरज आहे. गरजा जश्या वेगवेगळ्या असू शकतात त्याचप्रकारे नातीसुद्धा भिन्न भिन्न असू शकतात. माणसांच्या गरजा वाढण्याचे कारण म्हणजे स्वतःमध्ये असणाऱ्या अपुरेपणाची जाणीव. आणि ही अपुरेपाणाची जाणीव घालवून तो परिपूर्ण बनण्यासाठी नाते-संबंध बनवतो. जेव्हा तुमचे तुमच्या प्रिय व्यक्तीशी घनिष्ट संबंध असतात, तेंव्हा तुम्हाला परिपूर्ण वाटते. पण जर संबंध बिघडले तर तुमच्यात अपुरेपणाची भावना निर्माण होते. हे असे का बर? या आपल्या जीवांनाच पूर्णपणे स्वतंत्र स्वतःचं असं एक अस्तित्व आहे. मग हा अपुरेपणाचा भाव का? का हा जीव दुसऱ्या जीवाशी भागीदारी करून परिपूर्ण बनण्याचा प्रयत्न करतो? याचे मुळात कारण हे आहे की आपण या जीवाची पूर्णपणे सधनता व परीमापण जाणून घेतलेल नाही. जरी हा एक मुख्य घटक आहे तरी नात्यांची प्रक्रिया किचकट आहे.
अपेक्षांचं स्रोत
जिथं नातं असत तिथ अपेक्षा असते. बहुतांश लोकांच्या अपेक्षा अश्या असतात की या पृथ्वीवरची कोणतीही व्यक्ती त्या तो कधीच पूर्ण करू शकणार नाही. विशेषकरून स्त्री आणि पुरुष मधील संबंध. अपेक्षा एवढ्या असतात की जर तुम्ही अक्षरश: देवाशी किंवा देवीशी जरी लग्न केलंत तरी ते सुद्धा तुम्हाला निराश करतील. जोपर्यंत तुम्हाला अपेक्षाबद्दल किंवा त्यांच्या मुळाबदल काही समजणार नाही, तो पर्यंत तुम्ही अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. पण जर तुम्हाला कळले की अपेक्षांचा स्रोत काय आहे, तुम्ही एक खूप सुंदर भागीदारी बनवू शकता.
मुळातच तुम्ही नात्यांच्या शोधत का असता? कारण..... तुम्हाला जाणवेल की नात्याविना तुम्ही खचता. तुम्हाला सुखी राहायचं असतं, आनंदी राहायचं असतं. म्हणून तुम्ही नाती शोधता. किंवा जर वेगळ्या शब्दात सांगायचं झाला तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तींना तुमच्या आनंदाचा स्रोत बनवण्याचा प्रयत्न करत असता. जर तुम्ही मुळातच स्वत:हून आनंदी असाल, नाती ही तुमचा आनंद अभिव्यक्त करण्याचे माध्यम ठरेल, न की आनंद मिळवण्याचे साधन. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीचे दमन करून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असाल आणि समोरची व्यक्तीसुद्धा तुमच्याशी हेच करत असेल तर हे नातं काही काळानंतर त्रासदायी ठरणार आहे. सुरुवातीला हे ठीक वाटेल कारण काहीतरी गरजा पूर्ण होत आहेत. पण जर तुम्ही तुमचा आनंद अभिव्यक्त करण्यासाठी नाती बनवत असाल तर तुमच्याबद्दल कोणीसुद्धा गाऱ्हाणे घालणार नाही, कारण तुम्ही तुमचा आनंद व्यक्त करण्याच्या प्रक्रियेत आहात, न की दुसऱ्या व्यक्तीकडून आनंद मिळवण्याचा.
जर तुमचं आयुष्य हेच आनंद अभिव्यक्त करत असेल न की आनंदाच्या शोधत, तर , नाती ही साहजिकच विस्मयकारक ठरतील. तुम्ही असंख्य नाती बनवू शकता आणि ती जपू ही शकता. ही सगळी दुसर्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची करामत आहे ना.....,याची गरजच भासणार नाही. कारण जर तुम्ही आनंदाची अभिव्यक्ती करत असाल तर त्यांनाही तुमच्या बरोबर राहण्याची इच्छा असेल.
जर तूम्हाला वाटत असेल की तुमचे नाते तग धरून राहावे , तर तुमचे आयुष्य हे सुख शोधणारे नसून आनंद व्यक्त करणारे झाले पाहीजे.
भिन्न-भिन्न प्रकारची नाती
तुमचे शरीर आत्ताच्याक्षणी असे बनले आहे की त्याला या स्थितीत नात्यांची गरज भासते. तुमचे मन असे बनले आहे की त्याला आत्तासुद्धा नात्यांची गरज भासते. तुमच्या भावनांनासुद्धा नात्यांची भासते आणि अजून खोलवर गेलात तर या स्तरांवरसुद्धा तुमची उर्जा अशी बनलेली आहे की तिला अजूनसुद्धा नात्यांची गरज भासते. जर तुमचे शरीर नात्यांच्या शोधत गेले , आपण त्याला लैंगिकता असे म्हणतो. जर तुमचे मन नात्यांच्या शोधत गेले तर आपन त्याला साहचर्य असे म्हणतो. जर तुमच्या भावना नात्यांच्या शोधत गेल्या आपण त्याला प्रेम असे म्हणतो. जर तुमची उर्जा नात्यांच्या शोधत गेली तर आंपण त्याला योग असे म्हणतो.
या सर्व प्रयत्नानंतर तुमचा असे लक्षात येईल की ही जी काही लैंगिकता, साहचर्य, प्रेम, किंवा योग यांच्या माध्यमातून तुम्ही कशाशीतरी एक होऊ बघता .कारण तुम्ही जे काही आहात आत्ता ते पुरेसं नाही. मग तुम्ही कुणाशी तरी एक कसा होऊ शकता? शारेरीकदृष्ट्या तुम्ही प्रयत्न केलेले आहेत, असे वाट की तुमच्या कडून होतंय ,पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही वेगळे होता. मानसिक दृष्ट्या तुम्ही प्रयत्न केलात ,खूप वेळा वाटलं की तुम्हाला जमतंय ,पण तुम्हला माहिती आहे की दोन मन एक कधीच नसतात. भावनिक दृष्ट्या तुम्ही प्रयत्न केलात पण खूप सहज दुरावा येतो.
कुणाशी तरी एक होण्याची जी ही उत्कंठा आहे ती पूर्ण करण्याचा मार्ग काय आहे? या कडे बघण्याचे भरपूर पैलू आहेत. तुमच्या बहुतेक हे निदर्शनास आले असेल की , तुमच्या आयुष्यात कधीतरी असा क्षण आला असेल जेव्हा तुम्ही खूप आनंदी, प्रेमळ किंवा हर्षित असता आणि तुमची जीवन उर्जा उत्साहित असते तेंव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्ही विस्तारलेले आहात . हा विस्तार म्हणजे काय? पण त्याअगोदर तुम्ही कुणाला “मी” असे म्हणता? “हा मी आहे , तो मी नाही” हे कुठल्या आधारे ठरवता? “संवेदनशक्ती” नाही का? जे काही तुमच्या संवेदनाच्या सीमेमध्ये आहे ते “तुम्ही” आणि जे सिमेबाहेर आहे ते “इतर“. आणि तो इतर म्हणजे नेहमी नर्कच असतो. तुम्हाला हा नर्क अनुभवायचा नसतो तर मानवतेच्या एका छोटया अंशाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असतो. ही “इतरांना” तुमच्यात सामावून घेण्याची उत्कंठा, याला नातं असे म्हणतात. जर तुम्ही इतारांना समावून घ्याल, तर ते नर्क तुमचे स्वर्ग बनेल. त्या स्वर्गाचा अंश आपल्या जीवनात सामावून घेणे, या सर्वांसाठीचा हा नात्यांचा खटाटोप आहे.
तुमच्या नात्यामागे काहीही उत्कंठा असोत ,शारेरिक प्रयत्न असोत किंवा मानसिक असोत, किंवा भावनिक असोत. पण तुम्हाला ऐक्य म्हणजे काय हे कधीच समजणार नाही. तुम्ही त्याचा क्षणाक्षणामध्ये अनुभव घ्याल , पण ऐक्य हे पूर्ण रुपी कधीही होणार नाही. जर तुम्ही तुमच्या अवती-भोवती असणारे जीवन स्वतःचे अंश असल्यासारखे अनुभवलं तर तुमचं अस्तित्वच बदलून जाईल. योग म्हणजे ऐक्याचा अनुभव आणि जेंव्हा हे होईल तेव्हा, नातं हे स्वतःच्या गरजा नाही तर दुसर्यांच्या गरजांकडे लक्ष देण्याचा मार्ग बनेल. कारण तुमच्या अश्या स्वतःच्या गरजाच काही उरणार नाहीत. आणि जर एकदा का तुमच्यामध्ये काही सक्ती नसेल आणि तुम्ही जे काही कराल ते जागरूकतेने कराल, नाती ही वरदान बनतील, न काही उत्कंठा, न कसली धडपड उरेल.