कोविड - १९ ची चिंता कशी हाताळावी?
सद्गुरू कोरोना विषाणूच्या चिंतेचा सामना कसा करावा याबद्दल एक अनोखा दृष्टीकोन देत आहेत, ते स्पष्ट करतात कि चिंता हि बाहेरील परिस्थितीचा परिणाम नसून आतून अजाणपणे तयार केली जात आहे. ते म्हणतात कि हिच वेळ आहे आपलं सर्व शहाणपण आणि लवचिकता पुढे आणून या आव्हानाला सामोरे जाण्याची, आणि यावर मात करण्याची.
चिंतेचं मूळ
सद्गुरू: भय, क्रोध, चिंता, आनंद, दुःख किंवा परमानंद असो, या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत. जर तुम्हाला भीतीचा अनुभव आला असेल तर तुम्हाला कळेल असेल कि ती मानवी मनातील सर्वात दुर्बल करणारी भावना आहे. हा तुम्हाला खाली खेचणारा अनुभव आहे, तुमचा उद्धार करणारा अनुभव नाही. लोकं असं मानतात कि भीती, राग, आणि चिंता हे सर्वांना असतातच आणि आपल्याला त्यांना सामोरे जावे लागते. नाही, तुम्ही ते तयार करता. प्रत्येक मानवी अनुभव हा तुमच्या आतूनच येत असतो. त्यांना बाहेरून प्रेरणा मिळत असेलही, परंतु तुम्हीच त्यांना तयार करीत असता. एकाच परिस्थितीमध्ये, एक व्यक्ती भीतीमुळे पूर्ण घाबरून जाऊ शकते, तर दुसरी व्यक्ती एकदम अविचलित राहू शकते.कोविड-१९ च्या चिंतेतून मुक्त होण्यासाठी प्रतिसादाची गरज आहे प्रतिक्रियेची नाही
याचा अर्थ असा आहे कि भीती परिस्थितीमुळे येत नाही, तर तुम्ही ज्या प्रकारे तिला प्रतिक्रिया देत आहात त्यामुळे होत आहे. तुम्ही जर प्रतिक्रियेच्या स्थितीत असाल, तर काहीही आणि कोणीही तुमच्या आयुष्याचा ताबा घेऊ शकतो. म्हणूनच आम्ही प्रतिसादाबद्दल बोलतो. जबाबदारी हि एक नागरिकशात्रातील बाब नाही. मूलतः जबाबदारी म्हणजे तुमची प्रतिसाद देण्याची क्षमता. जर तुमच्याकडे प्रतिसाद देण्याची क्षमता असेल तर तुम्ही ते तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणेच कराल. परंतु तुम्ही जर एक सक्तीची प्रतिक्रिया असाल तर बाहेरील परिस्थिती तुमच्या आयुष्याचा ताबा घेईल. विषाणू असो किंवा नसो, बाहेरील परिस्थिती शंभर टक्के तुमच्या हातात कधीच असणार नाही. हा अस्तित्वाचाच स्वभाव आहे. विषाणू येण्याआधीही, तुमचे घर, कार्यालय, किंवा रस्त्यावरील परिस्थिती शंभर टक्के तुमच्या हातात कधीच नव्हती. आताही तसंच आहे. तर होय, हा एक विषाणू आहे, परंतु सुदैवाने आपणच त्याचे वाहक आहोत. आपण जर सावध आणि जागरूक राहिलो तर आपण यातूनही जगू. प्रत्येकजण याची तुलना युद्धाशी करत आहे. किमान आपल्या घरांवर कोणी बॉम्ब तरी टाकत नाही, आणि रस्त्यावर सैनिक आपल्यावर गोळीबार करत नाहीत. हे एक युद्ध आहे पण अत्यंत मवाळ युद्ध आहे. आपण जर जबाबदारीने वागले, तर आपण ते थांबवू शकतो. आपण जर बेजबाबदारपणे वागलो तर ते झपाट्याने पसरेल.
जर हा विषाणू अठरा ते चोवीस महिन्यांपर्यंत टिकला, तर अनेक मार्गाने आपल्याला माहित असलेल्या आपल्या अस्तित्वाची कार्यपद्धती बदलून टाकेल. असं नाही कि संपूर्ण मानवजातच नष्ट होईल, परंतु आपला क्रियाकलाप, व्यापार, जीवनशैली, शिक्षण आणि जवळपास सर्वकाही आपण कसे पार पडतो त्या सर्वांमध्ये फार मोठे बदल घडतील. हीच वेळ आहे जेव्हा आपली बुद्धिमत्ता, उपजत प्रतिभा, लवचिकता आणि एकमेकांच्याबद्दल प्रेम बाहेरआले पाहिजे. आपल्यातील सर्वोत्कृष्ट बाहेर येण्याची गरज आहे कारण अशा प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्हाला तुमच्या उत्कृष्ट क्षमतेत असावंच लागेल. हि वेळ चिंता करण्याची, निराशेची किंवा घाबरून जाण्याची नाही; जेव्हा कोणाला भीती किंवा चिंता वाटते, तेव्हा ते स्वतःमध्ये लुळे पांगळे होऊन जातात. हि वेळ स्वतःला पांगळे करून घेण्याची नाही आहे. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आपल्याला आपल्या सर्वोत्तम क्षमतेत असावंच लागेल.
होय, हे एक गंभीर आव्हान आहे. परंतु या आव्हानात्मक काळातच पुरुष आणि स्त्रियांतील सर्वोत्तम व्यक्तींचा उदय झाला आहे कारण मानवात असं काहीतरी आहे जे आव्हानांपुढे गुढगे टेकायला तयार नाही. सुरवातीला, भीती, चिंता आणि थोड्याफार प्रमाणात त्रास झाला कारण लोकांना त्यांच्या आरामदायक कक्षेच्या बाहेर ढकलण्यात आले. परंतु जेंव्हा एखादे आव्हान खरोखर आपल्याला भेडसावते, तेंव्हा मानव त्यांचा सामना करण्यासाठी उभे राहतात, आणि त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करतात, आणि मोठ्या श्यक्यता निर्माण करतात. मला नाही वाटत कि हि जी उलथापालथ आहे हा जगाचा अंत आहे. जर आपण जबाबदारीने वागलो आणि हे सुरळीतपणे पार पाडले, तर आपण मृत्यू आणि नुकसान कमी करू शकतो.
कोविड - १९ ची चिंता मिटवण्याच्या दोन सोप्या पद्धती
स्तब्ध बसणे
तुम्ही त्याला ताणतणाव म्हणा, चिंता किंवा इतर काहीही म्हणा – मूलतः, तुमच्या शारीरिक व्यवस्थेमध्ये घर्षण होत आहे. म्हणून सर्वप्रथम हे महत्वाचं आहे कि, तुमची शारीरिक व्यवस्था भौमित्तिकदृष्ट्या चांगली मांडली आहे आणि पुढील गोष्ट म्हणजे, तिच्यामध्ये योग्यरीत्या वंगण घातले गेले आहे. असं करण्याचे अनेक मार्ग आहेत. जिथे भौमितिक परिपूर्णता आहे, तिथे कोणतेही प्रयत्न करावे लागत नाही, तिथे कसलेही घर्षण नसते. हेच तुम्हाला तुमच्या शारीरिक व्यवस्थेमध्ये आणायचे आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींना तुमच्या आयुष्याचा ताबा घेऊन देऊ नका. तुम्हाला सतत त्रस्त करणारी एक छोटीशी चिंता तुमच्या जीवनाच्या प्रक्रियेला मर्यादित आणि नष्ट करू शकते. हे लवकरात लवकर ठीक केलं पाहिजे.
प्रणालीमध्ये समतोल आणण्याचे काही सोपे मार्ग आहेत. सर्वात सोपी गोष्ट म्हणजे तुम्ही व्यवस्थित बसायला शिका. अशा प्रकारे बसा कि तुमच्या शरीराला कोणत्याही स्नायूंच्या आधाराची आवश्यकता भासणार नाही,ते इतकं संतुलित राहिलं पाहिजे कि तुम्ही जर बसलात तर ते तसंच सहजपणे बसून राहिल. दिवसातील फक्त काही तास असं करा, आणि तुम्ही पाहाल - तुम्हाला खूप बरं वाटायला लागेल. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी इतरही खूप जटिल प्रक्रिया आहेत ज्या तुम्ही करू शकता. परंतु किमान एवढंतरी प्रयत्न करा - भौमित्तिकदृष्ट्या, तुम्ही स्वतःला अशा प्रकारे ठेवा कि तुमच्या शारीरिक व्यवस्थेमध्ये कोणताही ताणतणाव नसेल.
ऊर्जेचा आवेग तयार करण्यासाठी ध्वनीचा वापर.
आपण अशा परिस्थिती आहोत जिथे विषाणूबद्दलचं संपूर्ण चित्र आपल्यासमोर नाही. जेव्हा आवश्यक असणारी माहिती उपलब्ध नसते, तेव्हा एखाद्याच्या बुद्धीला असहाय्य वाटते आणि ती उदासीनता, असहाय्यता आणि आकांताच्या भावनेला उत्तेजित करते. हि अशी वेळ आहे जिथे तुम्ही तुमच्या उर्जेला उत्साही ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या ऊर्जा प्रफुल्लीत ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्ही ऊर्जेने भरून वाहत असाल, तर जरी तुम्हाला बौद्धिक समज नसेल,तरी तुम्ही पाहाल तुम्ही तुमच्या प्रणालीबरोबर योग्य त्याच गोष्टी कराल - ती एका विशिष्ट मार्गाने कार्य करेल. तुम्ही करू शकता अशी एक गोष्ट म्हणजे विशिष्ट बौद्धिक, भावनिक किंवा भौतिक प्रक्रियेसह एक शक्तिशाली आवाज वापरा. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही खाली बसता किंवा उभे राहता, तेव्हा तुमची कार्यप्रणाली कशी काम करते ते सर्व काही बदलून जातं. केवळ शारीरिकदृष्ट्याच नव्हे तर ऊर्जेच्या आणि रासायनिक पातळीवर सुद्धा. याच कारणाने या संस्कृतीमध्ये आपण एक प्रक्रिया विकसित केली कि तुम्ही खाली बसत आहात किंवा उभे राहत आहात, तुम्ही "शिव" म्हणता, जर तुम्ही काही चांगलं पाहिलं किंवा काही वाईट पाहिलं, तुम्ही "शिव" म्हणता. जेव्हा असे बदल होत असतात, तेव्हा तुम्ही जर एक प्राणप्रतिष्ठित शक्तिशाली शब्द तुमच्यामध्ये उच्चरलात, तर तुमच्यामध्ये ऊर्जा भरून वाहील.