कंगना राणावत: सदगुरू, तुम्ही म्हणता की आपल्याला कर्मची बंधनं तोडण्याचा प्रयत्न करायला हवा, पण त्याचवेळी तुम्ही लोकांना
अतिशय समावेशक असायला सांगता, करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत स्वत: ला पुर्णपणॆ झोकून द्यायला सांगता. तर या दोन्ही गोष्टीं एकाच वेळी कश्या शक्य आहेत? कृपया स्पष्ट करा. 

सदगुरू: नमस्कार कंगना! तुला या दोन्ही गोष्टींमध्ये विसंगती कशी काय दिसतेय? कर्म म्हणजे शरीरानं, मनानं, भावनां, आणी उर्जेनं केलेल्या सर्व कृतींची मागे उरलेली स्मृती. किंवा दुसऱ्या शब्दात, हे तुम्ही नकळतपणे निर्माण केलेलं एक विशिष्ट सॉफ्टवेअर आहे. हा एक ठराविक स्मृतीचा संचय आहे जो तुमच्या आयुष्यावर अनेक प्रकारे राज्य करतोय.

शारिरिक स्मृती असते, मानसिक स्मृती असते, भावनांची स्मृती असते, आणी उर्जेच्या पातळीवरही स्मृती असते. या सर्व गोष्टीं एकत्रितपणे तुमच्या आयुष्यावर राज्य करतात. तर स्मृती म्हणजे, ती कितीही असू दे, ती एक मर्यादित सिमा निश्चित करते. 

कर्म म्हणजे एक मर्यादित सीमा. त्या मर्यादित सीमांच्या आत, कर्म खुप फायद्याचं आहे.

तुमच्या स्मृतीमध्ये जे काही आहे, ते एक मर्यादित सीमा ठरवतं. तर कर्म म्हणजे एक मर्यादित सीमा. त्या मर्यादित सीमांच्या आत, कर्म खुप फायद्याचं आहे, यानंच अनेक गोष्टी शक्य होतात. ते तुम्हाला बऱ्यापैकी ऑटोमैटिक बनवतं, तुम्ही खुप साऱ्या गोष्टींना सहजपणे प्रतिसाद देऊ शकता. 

पण जेव्हा तुम्हाला विस्तार करायचा असतो, तेव्हा सीमेची अडचण होते. जर तुम्ही एक सिमा आखली, समजा तुमच्या घराभोवती, आता जर तुम्हाला विस्तार करायचा असेल, तर सोपंये, तुम्हाला फक्त ती ओलांडून बाहेर जायचंय. पण समजा तसं करून तुमच्या अस्तित्वाला काही धोका असला, तुमच्या जीवाला धोका असला, तर तुम्ही तुमच्या भोवती किल्ल्याप्रमाणे एक तटबंदी बांधाल.

समावेशक वृत्ती म्हणजे फक्त सर्वांशी मैत्री करणं नाही. सर्वसमावेशकता हा अस्तित्वाचा मूळ, स्वाभाविक गुणधर्म आहे.

आता धोका असला तरीही तुम्हाला सुरक्षीत वाटेल. पण जर तुमच्या जीवाला कुठलाही धोका नसेल, तर साहजिकच तुम्हाला विस्तार करावासा वाटेल. जेव्हा तुम्हाला विस्तार करायचा असेल, तेव्हा ही भव्य तटबंदी हलवून सिमेचा विस्तार करणं, खुप कठीण होतं. बऱ्याचदा कदाचित तुम्ही विस्तार करणार नाही- या तटबंदीमुळे! 

तर त्याचप्रमाणे, कर्म किंवा कार्मिक स्मृती तुम्ही निर्माण केलेली एक विशिष्ट भिंत आहे. जर तुम्ही यातून मोकळे झाला नाहीत, जर तुम्ही तुमच्यात समावेशक वृत्ती आणली नाही, समावेशक वृत्ती म्हणजे फक्त सर्वांशी मैत्री करणं नाही. तुमच्या पूर्ण प्रकृतीत समावेशक वृत्ती आणणं. जेव्हा मी तुमच्या प्रकृतीत समावेशक वृत्ती म्हणतो, म्हणजे जसं आपण इथं या जंगलात आहोत, या झाडाचा जो उच्छवासे, तोच माझा श्वास आहे. आणी माझा उच्छवास, हाच त्याचा श्वास आहे.

अस्तित्वाचा मूळ, स्वाभाविक गुणधर्म म्हणजे सर्वसमावेशकता – याप्रती फक्त जागरूक होण्याची गरज आहे. कर्म म्हणजे तुमच्या व्यक्तिगत अस्तित्वाचा स्वभाव आहे. तुम्ही तुमच्या कार्मिक मर्यादांप्रती जागरूक झालं पाहिजे.

हे मी झाडांबद्दल बोलत नाहीये. पण बहुतांशी माणसं कदाचित या देवाणघेवाणीबद्दल अनभिञ आहेत. जर आपल्याला या देवाणघेवाणीची जाणीव असती, तर इथं बसून फक्त श्वास घेणं हाच एक अगदी सुंदर आणि सुखावह अनुभव असला असता. पण जरी तुम्ही याबद्दल जागरूक नसला, तरीही ते झाड बाहेर सोडणारा प्राणवायू तुमचं पोषण करतंच असतो. पण तुम्ही त्या अनुभवाला मुकताय.

तर, समावेशक वृत्तीचा अर्थ हा नाहिये की तुम्ही काहीतरी वेगळं करताय. तुम्ही फक्त अस्तित्वाच्या प्रकृतीबद्दल जागरूक झाला आहात, कारण अस्तित्व पूर्णपणे समावेशक आहे. जे त्या झाडासोबत घडतं, तेच तुमच्यासोबत घडतं. जे मातीसोबत घडतं, ते्च तुमच्यासोबत घडतं. ज्याला तुम्ही मी म्हणता, ती फक्त तुम्ही ज्यावर चालताय ती माती आहे. तर समावेशक वृत्ती , ही तुम्हाला करावी लागणारी गोष्ट नाहीये. समावेशक वृत्ती हा अस्तित्वाचा स्वभाव आहे. तुम्हाला फक्त त्याबद्दल जागरूक व्हायचंय. कर्म हा तुमच्या वैयक्तिक अस्तित्वाचा स्वभाव आहे. तुम्हाला फक्त तुमच्या कर्मांच्या सिमेच्या मर्यादेबद्दल जागरूक व्हायला हवं. जर ही जागरूकता तुमच्यात आली, तर बाकीचं सगळं, जीवन स्वत:च करेल.

संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugwithSadhguru.org वर