सद्गुरूंद्वारे कर्माबद्दलचे २० सुविचार । 20 Karma Quotes From Sadhguru in Marathi
'कर्म' - जो शब्द मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने मांडला गेला आहे - त्या कर्माबद्दलचे हे विचार गैरसमज दूर करतील आणि स्पष्टता देतील.
ArticleNov 6, 2024
कर्म म्हणजे तुम्ही तुमचं जीवन स्वतःच घडवता.
जीवनाच्या प्रत्येक क्षणी - शारीरिक, मानसिक, भावनिक आणि ऊर्जेच्या पातळीवर तुम्ही कृती करता. प्रत्येक कृती एक स्मृती तयार करते. हेच आहे कर्म.
भक्ती कर्म नष्ट करते आणि मुक्तीकडे नेते.
कर्म म्हणजे कृती आणि स्मृती दोन्हीही. कृतीशिवाय स्मृती नाही आणि स्मृतीशिवाय कृती नाही.
कर्मांचे जुने थर तुम्हाला तेव्हाच चिकटू शकतात, जेव्हा तुम्ही नवनव्या गोंदरुपी कर्मांच्या थरांची भर घालता.
कर्म तुमच्या कृतीत नाही - तर ते तुमच्या उद्देशात आहे. कर्माची निर्मिती तुमच्या जीवनातल्या घटनांमुळे नाही, तर त्यांच्या संदर्भांमुळे होते.
कर्म काही ठराविक प्रवृत्तींनुसार काम करतं. पण थोडी जागरूकता ठेवली आणि लक्ष दिलं, तर तुम्ही त्याला वेगळी दिशा देऊ शकता.
सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये, स्वतःच्या फायद्यासाठी किंवा दुसऱ्यांचं नुकसान करण्यासाठी तंत्रविद्येचा वापर करणं, हे एखाद्यासाठी सर्वात वाईट ठरतं.
कर्म हे जुन्या रेकॉर्डिंग्सप्रमाणे आहेत, जे पुन्हा पुन्हा वाजत राहतात. योग म्हणजे त्याच त्या गोष्टींची पुनरावृत्ती करणं नव्हे, तर आयुष्य एक गहन शक्यता आणि अनुभव बनवणं होय.
जाणीवपूर्वक केलेल्या कृतींमुळे नाही - तर नकळत दिलेल्या प्रतिक्रियांमुळे कर्म निर्माण होतं.
तुम्ही जी कोणती शारीरिक क्रिया करता – ती जर तुम्ही समरसून आणि आनंदाने केली, तर तुम्ही कर्मयोगी आहात.
इथं काहीही अपघातानं होत नाही. संपूर्ण भौतिक अस्तित्व कारण आणि परिणाम यांमध्ये घडतंय.
कर्म म्हणजे तुमचं जीवन तुमचीच निर्मिती आहे. जमा झालेलं कर्म एकतर गती देतं किंवा ओझं बनतं – ती निवड तुमची आहे.
भूतकाळात तुम्ही कोणत्याही प्रकारचं कर्म गोळा केलं असलं, तरी या क्षणीचं कर्म नेहमीच तुमच्या हाती असतं.
तुम्ही काहीही करा, फक्त एवढं तपासा - हे फक्त स्वतःसाठी आहे की सर्वांच्या भल्यासाठी आहे. यामुळे चांगल्या आणि वाईट कर्माबद्दलचे सगळे संभ्रम दूर करतं.
तुमच्या आकलनावर स्मृतीची छाप पडणं हे कर्म आहे. तुमची स्मृती हीच तुमच्या पूर्वग्रहांचा पाया आहे.
कर्म हे तुमची उपजीविका आणि बंधन आहे. आणि तुम्ही ते व्यवस्थित हाताळलं, तर तुमच्या मुक्तीचं कारण सुद्धा होऊ शकतं.
कर्मयोग म्हणजे सेवा नाही. त्याचा अर्थ आसक्तीपूर्ण कृतीच्या पार जाणं आहे.
कर्म म्हणजे सर्वोच्च जबाबदारी. तुम्ही तुमच्या वंशिकतेची सुद्धा जबाबदारी घेता.
तुम्ही जर खरोखरच ध्यानस्थ झालात, तर कर्माच्या पलीकडे जाल.