कथा 1 : शिव आणि बैलगाडी 

सद्गुरु: हे सुमारे तीनशे वर्षांपूर्वी घडले. कर्नाटकच्या दक्षिणेकडील भागात एक भक्त होता, ज्याची आई वयोवृद्ध होती. तिला काशीला जायचे होते आणि विश्वनाथाच्या, म्हणजेच शिवाच्या, मांडीवर डोके ठेऊन मरण स्वीकारायचे होते. तिने तिच्या आयुष्यात कधीही काहीही मागितले नव्हते, परंतु या एका गोष्टीची विनंती तिने आपल्या मुलाला केली. ती म्हणाली, “कृपया मला काशीला घेऊन जा. मी म्हातारी होत चालली आहे मला तिथे जाऊन मरण्याची इच्छा आहे.”

"मी त्याला ओळखत नाही, कारण मी त्याला पाहिले नाही. ”मी फक्त एक चादर पाहिली आणि त्याला चेहरा नव्हता. तेथे काहीही नव्हते, ते रिक्त होते.”

सद्गुरु: हे सुमारे तीनशे वर्षांपूर्वी घडले. कर्नाटकच्या दक्षिणेकडील भागात एक भक्त होता, ज्याची आई वयोवृद्ध होती. तिला काशीला जायचे होते आणि विश्वनाथाच्या, म्हणजेच शिवाच्या, मांडीवर डोके ठेऊन मरण स्वीकारायचे होते. तिने तिच्या आयुष्यात कधीही काहीही मागितले नव्हते, परंतु या एका गोष्टीची विनंती तिने आपल्या मुलाला केली. ती म्हणाली, “कृपया मला काशीला घेऊन जा. मी म्हातारी होत चालली आहे मला तिथे जाऊन मरण्याची इच्छा आहे.”

त्या माणसाने त्याच्या वृद्ध आईला सोबत घेतले आणि ते दक्षिण कर्नाटकातील जंगलांमधून काशीकडे चालत जाऊ लागले. – खूप दूरचे अंतर. म्हातारी असल्याने आई आजारी पडली.म्हणून त्याने तिला आपल्या खांद्यावर घेतले आणि लवकरच त्याची शक्ती संपून गेली.स्वतःला पुढे घेऊन जाण्याचा एकमेव मार्ग त्याच्याकडे होता आणि तो म्हणजे शिवाची प्रार्थना करणे की “शिवा, कृपया मला या एका प्रयत्नात अपयश देऊ नका.” माझ्या आईने येवढी एकाच गोष्ट माझ्याकडे मागितली आहे, कृपया मला ती पूर्ण करू द्या. मला तिला काशीला घेऊन जायचे आहे. आम्ही तिथे फक्त तुमच्यासाठी येत आहोत. कृपया मला शक्ती द्या.”

मग तो चालत असताना त्याला घंटेचा आज ऐकू आला, बैलगाडी तुमच्या मागे येत असताना जसा आवाज येईल तसा. त्याने एकाच बैलाने खेचत असलेली एक बैलगाडी धुक्यातूनबाहेर येताना पाहिली, त्याला हे थोडे विचित्र वाटले कारण त्या प्रदेशात अगदी थोडे अंतर पार करायचे असेल तरच तुम्हाला एक बैल जोडलेली बैलगाडी दिसून येईल. जेव्हा प्रवास मोठा असतो, आणि जंगलांमधून केला जातो तेव्हा नेहमीच दोन बैल जोडलेले असतात. परंतु जेव्हा तुम्ही खूप थकलेले असाल तेव्हा आपल्याला हे बारकावे लक्षात येत नाहीत. गाडी जवळ आल्यावर त्याला चालकाचा चेहरा दिसला नाही कारण चालकाने चेहेऱ्यावर कपडा गुंडाळलेला होता आणि तेंव्हा धुके पडले होते.

तो माणूस म्हणाला, “माझ्या आईला बरं वाटत नाहीये, कृपा करून आम्ही तुमच्या रिकाम्या गाडीत बसून प्रवास करू शकतो का? ”त्या माणसाने होकार केला. दोघेही गाडीत बसले आणि गाडीचा प्रवास सुरू झाला. काही वेळाने, त्या माणसाला लक्षात आले की ही जंगलाच्या रस्त्यांच्या मानाने हा प्रवास खूपच आरामशीर आहे. मग त्याने खाली पाहिले आणि लक्षात आले की गाडीची चाके फिरत नाहीयेत. ती एका जागी स्थिर होती. पण गाडी मात्र चालत होती! मग त्याने बैलाकडे पाहिले. बैल बसला होता आणि तरीही गाडी चालतच होती. मग त्याने चालकाकडे पाहिले. फक्त चादर दिसत होती. पण माणूस दिसत नव्हता. त्याने त्याच्या आईकडे पाहिले. आई म्हणाली, “अरे मूर्खा, आपण अगोदरच तिथे पोचलो आहोत. आता कुठेही जाण्याची गरज नाही. हीच माझी जागा आहे, मला जाऊ दे ”आणि आईने तिथेच प्राण सोडला. बैल, गाडी आणि चालक गायब झाले! 

तो माणूस आपल्या गावी परतला. लोक विचार करू लागले, “तो फारच लवकरच परत आला आहे. त्याने आईला वाटेत कुठेतरी सोडून दिले असावे. तो तिला काशीला घेऊन गेलाच नाही. ”त्यांनी त्याला विचारले,“ तू तुझ्या आईला कोठे सोडून दिलेस? ”तो म्हणाला,“नाही, आम्हाला जाण्याची गरज नव्हती, शिव आमच्यासाठी आले होते.”ते म्हणाले,“काय हा मूर्खपणा! ”तो म्हणाला,“तुम्हाला काय वाटते ते काही फरक पडत नाही. तो आमच्यासाठी आला आणि ते पुरेसे आहे. माझे आयुष्य उजळले आहे. मला ते मनापासून माहिती आहे. जर तुम्हाला माहित नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे.”मग त्यांनी विचारले,“ठीक आहे, मग तू प्रत्यक्ष शिवाला पहिले आहेस हे आम्हाला पटवून दे. तो तुमच्यासाठी तिथे आला. ”तो म्हणाला,“मी त्याला ओळखत नाही, कारण मी त्याला पाहिले नाही. ”मी फक्त एक चादर पाहिली आणि
त्याला चेहरा नव्हता. तेथे काहीही नव्हते, ते रिक्त होते.” 

मग सर्वांच्या अचानक लक्षात आले की तो माणूस तेथे उपस्थित नाही. त्यांनी फक्त त्याचे कपडे पाहिले. ते दक्षिण भारतातील एक महान ऋषी झाले. ते जेथे जेथे गेले तेथे लोकांनी त्याला चेहरा नसलेला म्हणून ओळखले.  

कथा 2: मल्ला: शिवभक्त आणि एक चोर 

illustration-of-malla-thief

सद्गुरु: मी एका योगीबद्दल सांगतो, मी ज्या ठिकाणी जन्मलो होतो त्या ठिकाणी अगदी जवळ राहत होता. मी या व्यक्तीबद्दल आणि तिथे घडलेल्या घटनांबद्दल ऐकले होते, परंतु तरुण असताना मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. या गोष्टीने मला एक प्रकारची धुंदी चढली होती, परंतु त्यावेळी मी त्यास जास्त महत्त्व दिले नाही.

शिव शिकारी होता. त्याने केवळ प्राणीच नव्हे तर मानवांवरही निशाणा साधला.

म्हैसूरपासून जवळ जवळ 16 किलोमीटर दूर अंतरावर एक भक्त रहात होता, सध्याच्या ननजनगुडच्या सरहद्दीवर. त्याचे नाव मल्ला होते. मल्ला कोणत्याही परंपरेशी संबंधित नव्हता किंवा उपासना किंवा ध्यान करण्याचा कोणताही औपचारिक मार्ग त्याला माहित नव्हता. पण अगदी बालपणापासूनच त्याने डोळे बंद केले तर त्याला फक्त शिवाची प्रतिमा दिसत असे. कदाचित भक्त हा त्याच्यासाठी चांगला शब्द नसेल. त्याच्यासारखे लाखोजण आहेत. ते शिवाचे बंदी आहेत. त्यांच्यासमोर कोणताही पर्याय नाही. कदाचित मी सुद्धा त्या सापळ्यात अडकलो गेलो. आम्ही त्याला शोधले नाही - काहीही शोधण्यात फारच अहंकार आहे, परंतु त्याच्या सापळ्यात अडकलो. शिव शिकारी होता. त्याने केवळ प्राणीच नव्हे तर मानवांवरही निशाणा साधला. हे आणखी एक होते.. 

मल्लाला शिवा शिवाय काहीच माहित नव्हते. तो कोणताही विशिष्ट व्यापार किंवा हस्तकला शिकला नाही आणि तो त्याच्या मनाप्रमाणे जगला. जर त्याने एखाद्याला रोखले आणि त्यांच्याकडून स्वतःला आवश्यक असलेले काही घेतले तर ते चुकीचे आहे असे त्याला कधी वाटलेच नाही. म्हणून त्याने तेच केले आणि एक डाकू म्हणून तो प्रसिद्ध झाला. 

लोकांना वापरावाच लागेल अशा वनातील एक मार्गावर तो एक नियमित डाकू बनला. तो ज्या ठिकाणी आपला “टोल” गोळा करीत असे त्या ठिकाणाला कन्नड भाषेत कळ्ळन मुले, म्हणजेच “चोरांचा कोपरा” म्हणजे म्हणून ओळखले जाऊ लागले. सुरुवातीला लोकांनी त्याला शिव्याशाप दिले पण जेव्हा वर्षाचा शेवट आला, तेव्हा त्याने लोकांकडून गोळा केलेला प्रत्येक पैसा खर्च महाशिवरात्री साजरा करण्यासाठी खर्च केला. त्याने एक प्रचंड मोठी मेजवानी दिली! 

म्हणून मग काही वर्षांनंतर लोक त्याला एक महान भक्त म्हणून ओळखू लागले आणि त्यांनी स्वेच्छेने योगदान देणे सुरू केले. ज्यांनी स्वेच्छेने योगदान दिले नाही, त्यांच्याबद्दल त्याच्या मनात कोणत्याही प्रकारची अढी नव्हती! 

काही वर्षांनंतर, एकमेकांचे भाऊ असलेले दोन योगी त्या मार्गावर आले आणि त्यांनी या माणसाला पाहिले,जो मनुष्य एक डाकू परंतु एक महान भक्त होता. ते त्याला म्हणाले, “तुमची भक्ती उत्कृष्ठ आहे, पण तुमच्या पद्धतीमुळे लोकांना त्रास होत आहे.” तो म्हणाला, “मी फक्त शिवासाठी हे करतोय, काय अडचण आहे?” त्यांनी त्याला पटवून दिले, त्याला बाजूला घेतले आणि त्याला इतर साधनेत गुंतवून ठेवले, आणि त्या ठिकाणाचे नाव कळ्ळन मुले ऐवजी मल्लन मुले असे ठेवले. आजही याला मल्लन मुले म्हणतात. आणि त्यांनी साजरा केलेला महाशिवरात्री कार्यक्रम त्या ठिकाणच्या एका मोठ्या संस्थेत विकसित झाला आहे. 

जेव्हा त्याने आपले डाकुचे काम सोडले आणि या योगींसोबत बसला तेव्हापासून सुमारे दीड वर्षातच त्याला महासमाधी मिळाली. त्यांनी त्याला अशा प्रकारे सोडल्यानंतर हे दोन योगीही बसले आणि त्याच दिवशी त्यांचे शरीर सोडून गेले. कबीनी नदीच्या काठावर आजही या लोकांसाठी एक अतिशय सुंदर मंदिर बांधले गेले आहे, ज्यांना अजूनही मल्लन मुले म्हणतात. 

कथा 3: कुबेर शंकराचा सर्वात महान भक्त कसा बनला 

सद्गुरु: कुबेर हा यक्षांचा राजा होता. यक्ष हे मध्यवर्ती जीव आहेत - ते ना इथले जीव आहेत ना ते तिथले जीव बनले - ते मध्यवर्ती आहेत. कथा अशी आहे की रावणाने कुबेराला लंकेमधून हद्दपार केले आणि कुबेराला मुख्य भूमीकडे पळावे लागले. आपले हरवलेले राज्य आणि लोकं यांच्या नैराश्यातून त्याने शिवपूजा करण्यास सुरवात केली आणि ते शिवभक्त –म्हणजे शिवाचे भक्त झाले.

त्याने गणपतीकडे बोट दाखवले आणि म्हणाला,“ हा मुलगा सतत भुकेलेला असतो. त्याला चांगले खायला घाल.” 

शिवाने आपल्या करुणेमुळे त्याला आणखी एक राज्य आणि जगातील सर्व संपत्ती देऊन टाकली आणि कुबेर हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. संपत्ती म्हणजे कुबेर - हे असेच दिसते. कुबेर एक महान भक्त झाला आणि जेव्हा एखाद्या भक्ताला आपण महान भक्त असल्याचे जाणवू लागले, तेव्हा त्याने सर्व काही गमावले. कुबेराला असे वाटू लागले की तो एक महान भक्त आहे कारण तो शिवांना विपुल प्रमाणात अर्पण करीत होता. शिवाने मात्र पवित्र राख वगळता त्यापैकी काहीही उचलले नाही. पण कुबेराला आपण एक महान भक्त आहोत असे वाटले कारण तो खूप काही अर्पण करत होता.

एके दिवशी कुबेर शिवाकडे आला आणि म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय करू शकतो? मला तुमच्यासाठी काहीतरी करायचे आहे. ”शिव म्हणाले,“ अरे, तू माझ्यासाठी काहीही करु शकत नाहीस. तू माझ्यासाठी काय करू शकतोस? कारण मला कशाचीही गरज नाही, मी ठीक आहे. पण माझ्या मुलाला घेऊन जा. ”त्याने गणपतीकडे बोट दाखवले आणि म्हणाला,“ हा मुलगा सतत भुकेलेला असतो. त्याला चांगले खायला घाल.”

कुबेर म्हणाला, “काही हरकत नाही” आणि तो गणपतीला जेवणासाठी घेऊन गेला. त्याने त्याला जेवायला वाढले, आणि तो खातच राहिला. तो वाढत राहिला आणि तो खातच राहिला. कुबेराने शेकडो स्वयंपाकी भाड्याने आणले आणि ते आणि प्रचंड प्रमाणात अन्न शिजवू लागले. त्यांनी ते सर्व त्याला वाढले आणि तो जेवत राहिला. 

कुबेर घाबरला. "थांबव हे!" तो म्हणाला. “तू जर असेच खात राहिलास, तर तर पोट फुटेल.” गणपती म्हणाले, “काळजी करू नका. पहा, हा साप माझा पट्टा म्हणून आहे. तुम्हाला माझ्या पोटाची चिंता करण्याची गरज नाही. मला भूक लागली आहे. मला वाढा. ते तुम्हीच आहात ना ज्यानी म्हटले होते की तुम्ही माझ्या भुकेची काळजी घ्याल.”

कुबेराने आपली सर्व संपत्ती खर्च केली. असे म्हणतात की त्याने लोकांना अन्न विकत घेण्यासाठी इतर जगात पाठविले, आणि त्यांनी अन्न दिले. पण गणपती फक्त खात राहिला आणि म्हणाला, “मी अजून तृप्त झालो नाही, अजून अन्न कोठे आहे? ”मग कुबेराला आपल्या मनाचे कोतेपण लक्षात आले आणि त्याने शिवाला नमन केले, “माझी श्रीमंती, मला समजून चुकले आहे, की तुमच्यासमोर ती धुळीच्या कणा येवढी सुद्धा नाही. आपण मला जे काही दिले आहे त्यातील थोडे आपल्याला परत करून मी एक महान भक्त आहे असे समजण्याची चूक केली. "आणि त्या क्षणापासून त्याचे आयुष्य वेगळ्या दिशेने गेले.

कथा 4: एक अर्धनारी म्हणून शिव आणि भृगु महर्षी

shiva-parvati-bhrigu-as-a-bird-going-around-shiva

सद्गुरु: जेव्हा आपण योग म्हणतो तेव्हा आपण विशिष्ट व्यायामाविषयी किंवा तंत्राविषयी बोलत नाही. आम्ही सृष्टीच्या विज्ञानाबद्दल आणि या निर्मितीच्या तुकड्याला त्याच्या अंतिम संभाव्यतेकडे कसे घेऊन जायचे याबद्दल बोलत आहोत. आपण एका विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी बोलत आहोत ज्याद्वारे आपण आपल्या जीवनाची प्रत्येक गोष्ट एक अंतिम शक्यता बनवू शकतो.

आता मात्र पार्वती रागाने धुमसत होती, म्हणून शिवाने तिला स्वतःमध्ये ओढले आणि तिला स्वतःचाच एक भाग बनविले. त्याचा एक भाग पार्वती झाला...

जेव्हा शिवाने सप्तर्षि किंवा सात ऋषींना योगाचा प्रसार आणि अस्तित्वाचे स्वरूप सांगण्यास सुरुवात केली तेव्हा एक सुंदर घटना घडली. नंतर भृगु महर्षि म्हणून परिचित झालेल्या सात ऋषींपैकी एक कट्टर शिवभक्त होते. पार्वती या कृपा सरोवर - म्हणजेच कांती सरोवरच्या काठावर होत असलेल्या या पहिल्या योग कार्यक्रमाची एक साक्षीदार होती. भृगु नेहमीप्रमाणे सकाळी आले आणि त्याला शिवांना प्रदक्षिणा घालायची होती. पार्वती जवळ बसली होती, परंतु भृगु त्यां दोघांच्यामधून चालत गेले आणि त्यांनी फक्त शिवाभोवती प्रदक्षिणा घातली. त्यांना आपली प्रदक्षिणा केवळ शिवांना घालायची होती, पार्वतीला नव्हे.

यामुळे शिवाला आनंद झाला पण पार्वतीला मात्र आनंद झाला नाही. तिला हे आवडले नाही. तिने शिवाकडे पाहिले, शिव म्हणाले, “जवळ ये, तो तुझ्या भोवतीसुद्धा फिरेल.” पार्वती जवळ गेली. भृगुने पाहिले की त्याला एकट्या शिवाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पुरेशी जागा नाही, म्हणून त्याने स्वत:चे रुपांतर एका उंदीरामध्ये केले आणि प्रदक्षिणा घालताना पार्वतीला एका बाजूला सोडून ते एकट्या शिवभोवती फिरले.

पार्वतीयामुळे वैतागून गेली. म्हणून मग तिला प्रसन्न करण्यासाठी शिवाने पार्वतीला आपल्या मांडीवर बसवले. भृगुने स्वतःचे रुपांतरएका लहान पक्ष्यामध्ये केले आणि त्यांनी पार्वतीला सोडून फक्त शिवाभोवती प्रदक्षिणा घातली. आता मात्र पार्वती रागाने धुमसत होती, म्हणून शिवाने तिला स्वतःमध्ये ओढले आणि तिला स्वतःचाच एक भाग बनविले. त्याचा एक भाग पार्वती झाला, आणि त्याचा दुसरा भाग शिव राहिला. तो अर्धनारी झाला.

भृगुने हे पाहिले आणि त्याने स्वत:चं रुपांतर मधमाशीमध्ये केले आणि तो फक्त उजव्या पायाच्या आसपास फिरू लागला. भृगुची ही बालिश भक्ती मनोरंजक होती, परंतु त्याचवेळी भृगुने स्वतःला आपल्या भक्तीमध्ये गमवावे आणि त्याने स्वतःच्या अस्तित्वाचे अंतिम स्वरूप गमावावे असे शिवाला वाटत नव्हते. म्हणून शिव सिद्धासनाच्या योग पावित्र्यामध्ये आला जेथे त्याच्या पायाभोवती किंवा शरीराच्या इतर कोणत्या भागाभोवती प्रदक्षिणा घालण्याचा कोणताही मार्ग नव्हता. त्याला जर प्रदक्षिणा घालायचीच असेल तर त्याला ती दोघांभोवती, स्त्रीलिंगी आणि पुरुषत्व या दोन्ही तत्त्वांसाठी घालावी लागेल.

ही कहाणी आपल्यापर्यंत असा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करते की जेव्हा आपण योग म्हणतो तेव्हा आपण एका परिमाणाबद्दल बोलत असतो जे सर्वसमावेशक असते. आरोग्य निर्माण करण्याची ही कसरत किंवा प्रक्रिया नाही. हे माणसाच्या अंतिम कल्याणासाठी आहे ज्यामधुन आपण जीवनाचे कोणतेही घटक वगळू शकत नाही. हे सर्व परिमाणांपेक्षा अधिक परिमाण मिळविण्याविषयी आहे. आपल्या स्वत:च्या अस्तित्वातील प्रणाली - आपले शरीर, मन, भावना आणि ऊर्जा – दिव्यत्वापर्यन्त पोहोचण्याची शिडी म्हणून वापरण्याची ही एक प्रणाली आहे. आपल्या स्वतःस आपल्या अंतिम स्वरूपाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठीची एक पद्धत आहे.