सेक्स बद्दल अत्याधिक विचार करत राहणं बरोबर आहे का? – सदगुरू याचं उत्तर देताहेत.
सद्गुरू, सेक्स बद्दल अत्याधिक विचार करत राहण्याबद्दलच्या प्रश्नावर प्रकाश टाकत, का बहुतांशी मानवजात त्याच्यामागे पळण्यात किंवा त्यापासून वाचण्यात गुंतलेली आहे याचा खुलासा करतात.
प्रश्न- मी भरपूर वेळ आणि माझी भरपूर उर्जा संभोग आणि लैंगिकतेविषयी विचार करण्यात खर्च होते. हे विचित्र आहे की काय मला माहित नाही, पण अनेक लोकांना तसं वाटतं. माझे पालक आणि इतर लोक ते पाप असल्यासारखं वागतात. मला तुमचे याबद्दलचे विचार जाणून घ्यायचे आहेत.
सद्गुरु: – एक जोक सांगतो,ऐका. एक सहा वर्षांची मुलगी एक दिवस शाळेतून घरी आली आणि तिनं तिच्या आईला विचारलं, “आई गं, माझा जन्म कसा झाला?”. आईला काय सांगावं कळेना. ती म्हणाली, “ आकाशातून एक बगळा उडत आला, आणि त्यानं तुला माझ्या ओटीत टाकलं. मुलीनं ते लक्षात ठेवलं.
तिनं पुढं विचारलं, “आई, तुझा जन्म कसा झाला?”
“मलासुद्धा एका बगळ्यानं इथं आणून सोडलं.
“आणि आज्जीचा जन्म कसा झाला?”
“तिलाही एका बगळ्यानं आणून सोडलं.”
"ती मुलगी विचारात पडली. जाऊन खाली बसली आणि आपल्या गृहपाठाच्या वहीत काहीतरी लिहू लागली. आईला जरा चिंता वाटू लागली. म्हणून मुलीचा गृहपाठ पूर्ण झाल्यावर, तिनं जाऊन तिची वही उघडून बघितली. त्यात कुटुंबाच्या वंशावली बद्दलचा निबंध होता. मुलीनं लिहिलं होतं, “आमच्या कुटुंबात, मागच्या तीन पिढ्यांमधे कुणाचाही नैसर्गिक जन्म झाला नाहीये.”
मैथुन क्रिया नैसर्गिक आहे, पण लैंगिकता आपली निर्मिती आहे
तर, यात विचित्र असं काहीच नाही. एवढंच आहे की तुमची बुद्धीवर हार्मोन्सचा पगडा आहे. ही फक्त एक सक्तीपूर्ण सवय आहे. तुम्ही लहान होता, तेव्हा कोणाच्या जननेंद्रियांबद्दल तुम्हाला काहीही रस नव्हता. पण ज्या क्षणी तुमच्यात हार्मोन्सचा खेळ सुरु झाला, तुम्हाला यापलीकडे काहीच दिसेनासं झालं. तुमच्या पूर्ण बुद्धिमत्तेवर हार्मोन्सनं कब्जा केला.
समागमाची क्रिया ही नैसर्गिक आहे – ती शारीरीक क्रिया आहे, शरीरात तिचं अस्तित्व आहेच. पण लैंगिकता ही तुम्ही निर्माण केलेली आहे. ती मानसिक आहे. ही आज जगाला आपल्या प्रचंड प्रवाहात घेरून आहे आणि अनेक प्रकारे ती विकृत बनलीये, कारण सेक्स शरीरात असे पर्यंत ठीक आहे – त्याच्या योग्य आणि नैसर्गिक जागेवर आहे. पण ज्या क्षणी ते तुमच्या मनात प्रवेश करतं, ती एक विकृती बनते. तुमच्या मनाशी त्याचं काही काम नसलं पाहिजे.
जरी आज लैंगिकता हा मानवी मनात एक मोठा प्रश बनून असली, तरी ही एक अगदी लहान बाब आहे. तुम्ही जरा शरीरापलीकडे गेलात, की स्त्री आणि पुरुष असं काही उरतच नाही. फक्त शरीराच्या पातळीवर, कुणी स्त्री किंवा पुरुष असू शकतो. प्रजननाच्या क्रियेतून प्राणीमात्रांचं अस्तित्व पुढे चालत राहण्यासाठी, या दोन शरीरात थोडासा बदल आहे. त्या शारीरीक बदलला आधार देण्यासाठी थोडाफार मानसिक बदल आहे. पण तरीही तेच दोन डोळे, नाक, तोंड – सर्वकाही सारखं आहे – फक्त जननेंद्रिय वेगवेगळी आहेत.
का आपण आपल्या मनात शरीराच्या या लहान भागांना एवढं मोठं करून ठेवलंय? जर तुम्हाला खरोखर शरीराच्या एखाद्या भागाला जास्त महत्व द्यायचं असेल, तर तो तुमचा मेंदू असला पाहिजे, जननेंद्रिय नव्हे!
लैंगिकतेची अनेक तत्वज्ञानं
लैंगिकता ही इतकी मोठी झाली आहे कारण कुठेतरी आपण आपल्या शरीराचा पूर्णपणे स्वीकार केलेला नाही. आपण शरीराच्या सर्व इतर भागांचा स्वीकार केला पण या एका भागाचा स्वीकार केला नाही. तुमची जननेंद्रिय सुद्धा तुमचे हात, पाय आणि इतर अवयवांप्रमाणेच आहेत. पण तुम्ही याला काहीसं वेगळंच स्थान दिलं. हे वाढत जाऊन, आता ती लोकांच्या मनात एक मोठी गोष्ट होऊन बसली आहे.
आज यानं तुमच्या मनाचा ताबा घेतलाय कारण कुणीतरी तुम्हाला सांगितलं की हे चूक आहे. आता तुम्ही हे सोडू शकत नाही कारण ही एक ‘वाईट गोष्ट’ झालीये. जे काही वाईट किंवा चूक आहे ते तुम्ही विसरू शकत नाही. तुम्ही जिथं जाल तिथं ते तुमच्या मागे येईल.
जी गोष्ट इतकं साधी आणि प्राथमिक आहे त्याबद्दल आपण चूक आणि बरोबर अश्या संकल्पना निर्माण केल्या आहेत. मग कुठलंतरी ढोबळ तत्वज्ञान तायर करून तुम्हाला ती ‘चुकीच्या गोष्ट’ तशीच ठेवून कसंतरी त्यातून सुटायचं असतं. लोकांच्या मनामधल्या लैंगिकतेच्या समर्थनासाठी कितीतरी प्रकारचं तत्वज्ञान सांगितलं जातं. मला हे कळत नाही की समागमासाठी तुम्हाला तत्वज्ञानाची काय गरज आहे. ही एक शाररीक बाब आहे. एवढं अवघड करायची गरज नाही. जर तुम्ही हे अवघड करून ठेवलं, तर उगाच ते तुमच्या आयुष्याचा एक मोठा हिस्सा होऊन बसेल.
या सगळ्या विचित्र कल्पनांमुळे, आपण एकतर कशाचीतरी अतिशोयक्ती करतो किंवा उगाच त्याला दाबून टाकायचा प्रयत्न करतो. जर तुम्ही आधुनिक समाजाकडे पाहिलं, मी तर म्हणेन की नव्वद टक्के मानवी उर्जा ही सेक्सच्या मागे धावण्यात किंवा त्यापासून पळून जाण्यात खर्च होत आहे. सेक्सची तुमच्या आयुष्यात एक ठराविक भूमिका आहे. जर तुम्ही याला अधिक मोठं केलं, तर ते तुमच्या मनाला विकृत करेल. जर तुम्ही ते नष्ट करायचा प्रयत्न केला, तर तुम्ही तुमच्या मनात अजून जास्त विकृत व्हाल.
लैंगिकता ही जास्त महत्वाची तेव्हा होते जेव्हा तुमची स्वतःची ओळख तुमच्या शरीराशी जास्त घट्ट बांधलेली असते. जशी तुमची ओळख स्वतःच्या शरीरापासून वेगळी होत जाते, तशी कामवासनाही कमी होते. तुम्ही पाहिलंय का, कुणी जर बौद्धिक स्तरावर खूप अधिक सक्रीय असेल, तर सेक्स ची कामना कमी होऊ लागते. पण बहुतांशी लोकांना बौद्धिक स्तरावरची धुंदी आणि त्यांच्या मनाचा गोडवा माहितच नाही. त्यांना भावनांचा गोडवा तितका माहित नाही. जीवन उर्जांचा गोडवा माहित असण्याचा तर प्रश्नच नाही. एकच गोष्ट ज्यामुळे त्यांना थोडी धुंदी अनुभवता येते ती म्हणजे सेक्स. शरीरात उत्पन्न होणारा काहीसा सुखद अनुभव म्हणजे सेक्स आणि ती एकच गोष्ट त्यांना ते जगत असलेल्या जीवनाच्या एकसारखेपणातून सुटका देते.
संभोगातून मिळणाऱ्या सुखापेक्षाही अधिक सुखावह...
जर तुम्ही सजग राहून स्वतःचं किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण केलं, जर ते अश्या स्थितीत असतील की कुठलीच शाररीक शिस्त नसेल, तर तुम्ही बघाल की ते हळूहळू असे बनतील की त्यांना कसंही करून सुखी व्हायचं असतं. आणि त्यांच्यामध्ये कुठलाच आनंद उरणार नाही. जसे तम्ही जास्त आनंदी होत जाता, तसं शाररीक सुखाची गरज तुमच्या आयुष्यात कमी होत जाईल. जर तुम्ही आनंदी नसलात, तर कसंतरी करून सूख शोधणारी अनावर कृती कराल, आणि कामवासना यापैकीच एक आहे. मी त्या नैसर्गिक क्रियेबद्दल बोलत नाहीये ज्यातून आपल्या सर्वांचा जन्म झाला. मी त्याच्या विरोधात बोलत नाहीये. पण तुम्ही त्याचा पगडा तुमच्या डोक्यातून काढून टाकला पाहिजे.
मी लोकांना म्हणताना एकतो – कुठल्याही गोष्टीसाठी ते म्हणतात, ‘ही तर अगदी सेक्सच्या खालोखाल मजा देणारी उत्तम गोष्ट आहे.”. सेक्स काही सर्वांत उत्तम गोष्ट नाही. आज ती जगात लोकप्रिय झाली असेल पण ती काही सर्वांत उत्तम गोष्ट नाही. जर तुम्ही जीवनाचे इतर पैलू चाखलेच नसतील तरच तसा विचार कराल. हे म्हणजे तुम्ही लहान होता, तेव्हा तुम्हाला ठराविक गोष्टींचं आकर्षण होतं, पण जसं तुम्ही मोठे होत गेला तसं काही गोष्टी विनासायास गळून पडल्या. लैंगिकता सुद्धा तशीच गळून पडली पाहिजे.
जश्या तुमच्या जीवन उर्जा अधिक प्रस्थापित आणि सूक्ष्म होत जात, तसं, इथं केवळ स्वस्थ बसून राहणं सुद्धा इतकं सुंदर होईल की तुम्हाला जाऊन दुसऱ्या कुणाच्या शरीराबरोबर काही करावंसं वाटणार नाही, कारण इथं नुसतं बसून राहणं हे संभोगापेक्षाही अधिक सूख देणारं होईल. जसजसं ही स्थिती तुमच्यासाठी जिवंत वास्तविकता होईल, की तुम्ही सदैव त्याच सुखात आहात, तेव्हा लैंगिकता तुमच्या आयुष्यातून नाहीशी होईल. तुम्ही असमर्थ झाला म्हणून नाही, किंवा तुम्हाला यात काही चूक किंवा अनैतिक वाटतं म्हणून नाही. पण केवळ एवढ्याश्या सुखासाठी जाऊन इतर कुणाला चिकटुन काहीतरी करण्यात काहीच अर्थ वाटणार नाही म्हणून.
लैंगिकता ठीक आहे, त्याबद्दल चूक किंवा बरोबर असं काही नाही. ती फक्त जीवनाचा एक अगदी लहान पैलू आहे एवढंच. जर ती तुमच्या शरीरात राहिली, तर काही हरकत नाही, पण जर तिनं तुमच्या डोक्यावर कब्जा केला, तर ही चुकीची जागा आहे. जर ती गोष्ट चुकीच्या जागी असेल, तर तुमच्या आयुष्यात पूर्ण गोंधळ उडेल.
संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugwithSadhguru.org वर.