माहिती आणि तंत्रज्ञानाचं ओझं कसं हाताळावं?
कर्नल. राज्यवर्धन राठोड, केंद्रीय मंत्री, युथ अफेर्स अँड स्पोर्ट्स, यांना तरुणाईचा काळ आणि जीवनातला आनंद, याबद्दलचं सत्य जाणून घ्यायचंय. आणि ते सद्गुरूंना आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या भडीमारातून आणि कामाच्या दडपणातून निर्माण होणाऱ्या स्ट्रेसचा सामना कसा करावा हे विचारतायत.
कर्नल राज्यवर्धन राठोड: तारूण्याचा काळ, म्हणजे आव्हानं, लक्ष्य, ध्येयप्राप्ती आणि महात्वाकांशांनी भरलेला काळ असतो. अनेक
लोक इतरांनी ठरवून दिलेल्या यशामागे धावतात. या हायपर कनेक्टेड, माहितीनं भरलेल्या युगामध्ये, जास्त माहिती आणी अतिरिक्त कामाचा तणाव ही जोडला जातो. असा तणाव आपल्या युवकांचा आनंद हिसकावून घेतो. तरूणांमध्ये डिप्रेशनच्या कित्येक केसेस पाहायला मिळतात. अशा कठीण परिस्थितित युवक सतत आनंदी कसे राहू शकतात. मला तारुण्य आणि आनंदाबाबतचं सत्य जाणुन घ्यायचंय.
सदगुरू: नमस्कार राज ….. हे पहा, प्रत्येक पिढीमध्ये काही असे लोक असतात, जे सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून तक्रार करत राहतात. आणि नक्कीच असेही लोक असतात, जे आपल्या काळातल्या परिस्थितीचा उपयोग करतात.
एक पिढी म्हणुन आज आपल्याकडे जास्त सुविधा आणि सवलती आहेत. आणि आपण काय हवं ते जाणुन घेऊ शकतो. जे लोक माहितीच्या भडीमाराबद्दल तक्रार करतायत, त्यांनी कल्पना करून पाहायला हवं, की एक हजार वर्षांपुर्वी, तुम्हाला १०० किलोमीटर दूर काय घडतंय, हे समजू शकत नव्हतं, जर १०० किलोमीटरवर एखादी मोठी आपत्ती किंवा कुठली अद्भुत गोष्ट घडली, तर तुमच्यापर्यंत त्याची बातमी पोचायला एक, दोन महिने लागायचे. आज जगात कुठेही काहीही घडलं, तरी लगेच तुमच्यापर्यंत पोहचतं. आणी तुम्ही त्याबद्दल तक्रार करताय?
कृपया याबद्दल तक्रार करू नका, कारण एक पिढी म्हणुन, ही आपल्याला मिळालेल्या सर्वात मोठ्या सुविधांपैकी एक आहे, आपण पुर्वीपेक्षा तांत्रिकदृष्ट्या कितीतरी जास्त सक्षम आहोत. यापुर्वी कधीही, मानवजातीकडे, इतक्या क्षमता नव्हत्या, ज्या आज आपल्याकडे आहेत, आणि हे केवळ टेक्नोलॉजीमुळे आहे. एवढंचे की, तुम्ही अशाप्रकारच्या जीवनासाठी स्वत:ला तयार केलेलं नाहिये. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा, की आज तुम्ही तंत्रज्ञानाबद्दल तक्रार करताय, ज्यानं तुमच जीवन सोपं आणि आरामदायी बनवलंय.
क्षमतांचा परिपूर्ण विकास
जरा कल्पना करा, हजार वर्षांपुर्वी तुम्ही इथं असता, तर सकाळी उठल्यावर तुम्हला पाणी लागणार, त्यासाठी तुम्हाला नदीपर्यंत चालत जाऊन दोन बादल्या पाणी घेऊन यावं लागलं असतं. विश्वास ठेवा, आजचे बहुतांशी युवक, एक बादली पाणी एक मैलही घेऊन जाण्य़ाइतके फिट नाहियेत. शारिरिक दृष्ट्या तेवढे सक्षमच नाहियेत.
तर, जर तुम्ही हजार वर्षांपुर्वी तंत्रज्ञानाविना इथं असता, तर काय तुम्ही तक्रार न करता पाण्याची बादली घेऊन आला असता? नाही, तुम्ही तक्रार केली असती, कारण तुम्ही शारिरिकदृष्ट्या सक्षम नाहीआत. याचप्रमाणॆ तुम्ही आजच्या कित्येक वास्तवांना सामोरं जाण्यासाठी स्वत:ला बौद्धिकरित्या सक्षम केलं नसेल, तर तुम्ही तक्रार कराल. तर तरूणांना हे समजण्याची गरज आहे, की त्यांच्या उमेदीच्या काळात, त्यांच्या महत्वकांक्षा, इच्छापुर्ती, किंवा हवी असणारी लाईफ स्टाईल मिळणं , हे महत्वाचं नाहिये. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे, या जीवनाला शक्यतेच्या एका उच्च स्तरावर कसं घेऊन जायचं याचा विचार करणं. जर तुम्ही पुरेसा वेळ गुंतवला, स्वत:च्या अंतरिक विकासासाठी, तर तुम्ही वर्तमान परिस्थिती अगदी सहजपणॆ हाताळाल.
आणी सर्वात महत्वाचं, या पिढीला ज्या प्रचंड सुविधा मिळाल्यायेत, त्याबद्दल तुम्ही तक्रार करणार नाही. यापुर्वी कधीच तुम्ही १४ तासांत भारतातून अमेरिकेला उडत जाऊ शकत नव्हता, यापुर्वी कधीच तुम्ही फोन उचलून जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसाशी बोलू शकत नव्हता. पुर्वी कधीच तुम्ही जगभरात घडणाऱ्या लाखॊ गोष्टी पाहू शकत नव्हता. इतकंच काय, अंतराळात काय चाललंय, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता.
स्वतःला अपग्रेड करणं
तुमच्या आजुबाजूचं तंत्रज्ञान प्रचंड वेगानं अपग्रेड होतंय, दर महिन्याला किंवा वर्षाला. वेळ आलीये, तुम्ही स्वत:ला अपग्रेड करण्याची. या यंत्रणेला अपग्रेड करणं. तुम्ही जे आहात, त्याला अपग्रेडे करणं, या जीवनाचा विकास होणं गरजेचंये. इनर इंजीनियरिंग किंवा योगाचा हाच अर्थ आहे की तुम्ही या जीवनाचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित करणं. हे जीवन विकसित केल्याशिवाय, जर तुम्ही तुमचं काम वाढवलं, तर
निश्चितच ते काम तुम्हाला दु:ख देईल. हे म्हणजे एका जुन्या खटारा कार ला फॉर्म्युला वन च्या ट्रॅक वर चालवण्यासारखं आहे. तिचे तुकडे होतील. लोकांसोबत हेच घडतंय.
वेळ आलीये, की फक्त उपजीविकेसाठी, फक्त एक नोकरी मिळवण्यासाठी, फक्त यामध्ये किंवा त्यामध्ये जाण्यासाठी, आपल्या मुलांना तयार करण्य़ाऎवजी, आपल्याला आपल्या मुलांना प्रथम स्वतःला विकसित करायला शिकवायला हवं. आत्मरूपांतरणाची साधनं या युगाची सर्वात महत्वाची गरज आहे. कारण बाहेरील परिस्थिती बऱ्याच प्रमाणात यंत्रं सांभाळुन घेतील. हे खुप महत्वाच आहे, की तुम्ही ज्या यंत्रांचा वापर करता, त्यांच्यापेक्षा तुम्ही जरा अधिक स्मार्ट असणं.
संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugWithSadhguru.org वर.