प्रश्न: मी सीईजीमध्ये, संगणक विज्ञान विषयातील बॅचलर्समध्ये पहिल्या वर्षात शिकत आहे. माझा प्रश्न असा आहे की, आम्ही सर्वजण १५ वर्षाहून अधिक काळ शिक्षण घेत आहोत, परंतु मी जे शिकलेय, त्यापैकी जास्तीत जास्त गोष्टी, व्यवहारात किंवा रोजच्या वापरात कशा आणायच्या, ते सापडत नाही. मला, मी शिकलेल्या काही गोष्टी, अर्थहीन का वाटतात?

सद्‌गुरू: नाही, नाही, असं इंजिनीरिंग कॉलेजमध्ये होऊ नये. हायस्कूलमध्ये असं झालं तर समजू शकतो - तिथं बरंच काही हेतुविरहीत आहे. पण टेक्निकल कॉलेजमध्ये असं व्हायला नको. 

आपली शिक्षण व्यवस्था प्रामुख्याने, ब्रिटीश राज्यव्यवस्थेसाठी कारकुनांचा पुरवठा व्हावा, म्हणून बनवली गेली. त्यामागे कोणतीही विचारधारा नव्हती - आज्ञेचं पालन करणं ही आमच्या शिक्षण व्यवस्थेची सर्वात महत्वाची बाब होती.

आपली शिक्षण व्यवस्था प्रामुख्याने, ब्रिटीश राज्यव्यवस्थेसाठी कारकुनांचा पुरवठा व्हावा, म्हणून बनवली गेली. त्यामागे कोणतीही विचारधारा नव्हती - आज्ञेचं पालन करणं ही आमच्या शिक्षण व्यवस्थेची सर्वात महत्वाची बाब होती. म्हणूनच आपल्याला संपूर्ण पाठ्यपुस्तक पाठ करून, परीक्षेत जाऊन डोकं रिकामी करावं लागे. ते शिक्षण उत्कृष्ट असल्याचं मानलं जातं. मी तांत्रिक शिक्षणाबद्दल असं असेल असं म्हणत नाही - मला वाटतं ते वेगळं आहे.

 

 

शिक्षणाचं परिवर्तन

 

आम्ही भारताच्या कापडांविषयी धोरण लिहिले, नद्या आणि शेतीवर धोरणं लिहिली, आणि सध्या आम्ही शिक्षणावर आधारित धोरण लिहिण्यात व्यस्त आहोत. माझ्या सततच्या पाठपुराव्यानंतर, सरकारने अलिकडेच जाहीर केले की शाळेचा फक्त पन्नास टक्के वेळ शैक्षणिक शिक्षण देण्यासाठी खर्च करावा आणि राहिलेला वेळ हा खेळ, कला, संगीत, हस्तकला अशा विविध गोष्टींना दिला गेला पाहिजे. सुमारे एका
महिन्यापूर्वी ही घोषणा केली गेली. घोषणा चांगली आहे, पण शाळा हा बदल स्विकारण्यासाठी सुसज्ज नाहीत. मी नेहमीच सांगतो, की जेवढा वेळ तुम्ही गणित आणि विज्ञानाला देता, तेवढाच संगीत, कला आणि इतर गोष्टींसाठी दिला जाणं, गरजेचं आहे. आम्ही आमच्या शाळेत, अशा प्रकारे व्यवस्थापन करतो, परंतु त्यांची संख्या फार कमी आहे.

सध्या केंद्र सरकारने हे जाहीर केलं आहे, परंतु याची खालच्या पातळीपर्यंत अंमलबजावणी व्हायला अद्याप उशीर आहे. त्यासाठी मानवी संरचना, भौतिक पायाभूत सुविधा, प्रशिक्षण याचबरोबर या देशात, अद्याप न घडलेल्या गोष्टी घडवण्याची गरज आहे. हे व्हायला वेळ लागेल, परंतु कमीतकमी हेतू साध्य झाला आहे. आम्ही सर्व मुलांसाठी शाळेचा शैक्षणिक वेळ, तीन ते चार तासांपर्यंत मर्यादित कसा ठेवू  शकतो याची पडताळणी करत आहोत. राहिलेल्या वेळात त्यांनी इतर गोष्टी शिकल्या पाहिजेत.

 

उभरतं संकट

 

आता आम्ही एक राष्ट्र बनवलं आहे, जिथे शेतकऱ्याचा मुलगा आपल्या वडिलांसह शेतात गेला आणि ते दोघे जर तिथे काम करत असतील, तर वडिलांना बालकामगार कायद्याअंतर्गत अटक केली जाऊ शकते. हो खरंच! देशामध्ये अशी असुरक्षिततेची भावना वाढीस लागतेय. जर तुम्ही देशातील कुठल्याही शेतकऱ्याला विचारलं की तुम्हाला तुमच्या मुलांना पुढे शेती व्यवसायात गुंतवायचं आहे का, तर फक्त दोन ते चार टक्के जण हो म्हणतील. पुढच्या २५ वर्षानंतर, जेव्हा ही पिढी नाहीशी होईल, तेव्हा या देशात अन्न कोण पिकवेल?

 

तुम्ही देशातील कुठल्याही शेतकऱ्याला विचारलं की तुम्हाला तुमच्या मुलांना पुढे शेती व्यवसायात गुंतवायचं आहे का, तर फक्त दोन ते चार टक्के जण हो म्हणतील. पुढच्या २५ वर्षानंतर, जेव्हा ही पिढी नाहीशी होईल, तेव्हा या देशात अन्न कोण पिकवेल?

तुमच्याकडे तांत्रिक विषयावर ज्ञान असू शकतं, तुम्ही एमबीए आणि अजून काही कराल, पण जरा शेतजमिनीवर जाऊन एखादं पीक उगवून दाखवा, मला बघू दे. हे फारच कठीण आहे! आपल्याला असं वाटतं की शेती अशिक्षित लोकांनी करायची गोष्ट आहे, पण तसं नाही. हे एक अत्यंत कठीण आणि फार दक्ष राहून केलेलं कार्य आहे. शेतकऱ्याकडे औपचारिक शिक्षण नाही, याचा अर्थ असा होत नाही की त्याला डोकं
वापरता येत नाही. त्याला जगण्याकरता अत्यंत महत्वाचं असं काहीतरी माहित आहे, आणि म्हणूनच आपण सगळे आत्ता खाऊन पिऊन आहोत. आपलं पोट भरलेलं आहे. पण पुढील २५ वर्षात, आपण स्वतःचं अन्न स्वतः पिकवायला असमर्थ ठरू, ही भीती वाटते.

कौशल्याची ओळख

Isha Vidhya kindergarten students in activity

 

फक्त काही ठराविक मुलांनाच, शालेय शिक्षण घ्यायची गरज असते. इतर मुलांनी कौशल्य आणि इतर अनेक विविध गोष्टी शिकायला हव्यात, ज्यामुळे ते स्वतःचं आणि देशाचं कल्याण करू शकतात. प्रत्येकजण शालेय जीवनासाठी अनुरूप असतोच असे नाही. अशांपैकी बरेचसे त्यांचे शालेय जीवन सोसत असतात. काही विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनातून आनंद मिळतो, परंतु बरेच जण असेही आहेत ज्यांना
अभ्यास आणि परीक्षा ह्यांच्या त्रासातून जावं लागतं. ह्या सारख्यांना शालेय शिक्षणाची जरूर नाही; त्यांनी त्यांचा स्वाभाविक कल ओळखून इतर काही कला आत्मसात कराव्यात. पण तुमची नैसर्गिक क्षमता ओळखणारं आणि तुम्ही आनंदाने काय करू शकता, हे सांगणारं, कोणी नाही.

एखाद्या इलेक्ट्रीशियन किंवा सुतारालादेखील, एखाद्या डॉक्टर किंवा अभियंत्याएवढी प्रतिष्ठा मिळणं आवश्यक आहे. तरच, शिक्षण समस्थितीत येईल.

दहा आणि पंधरा वर्षांच्या दरम्यान, आपल्या शिक्षण व्यवस्थेत एक प्रक्रिया हवी, जिथे विद्यार्थी निवड करू शकतील. सध्या, प्रत्येकाला सामाजिक प्रतिष्ठेचा मुखवटा धारण करण्यासाठी वैद्यकीय किंवा अभियांत्रिक शाखेत जायला आवडतं. एखाद्या इलेक्ट्रीशियन किंवा सुतारालादेखील, एखाद्या डॉक्टर किंवा अभियंत्याएवढी प्रतिष्ठा मिळणं आवश्यक आहे. तरच, शिक्षण समस्थितीत येईल. सर्वात महत्वाचं म्हणजे, आपल्या कोणाहीपेक्षा शेतकऱ्याला या समाजात वरचं स्थान मिळालं पाहिजे. आज तो आपलं पालन पोषण करतोय.

संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugwithSadhguru.org वर

Youth and Truth Banner Image