कठीण परिस्थितीसाठी सद्गुरुंकडून आशीर्वाद रुपी भेट
या विलक्षण कठीण काळातून तरून जाण्यासाठी सद्गुरु दैनंदिन सराव आणि साधना सांगत आहेत.
करोना व्हायरसमुळे आपण एका अगदी भयंकर कठीण परिस्थितून जात आहोत. ही जागतिक महामारी जगभर अजूनही पसरतच आहे. आपण सर्वजण आपल्या दैनंदिन आयुष्यात नाट्यमय बदल अनुभवत आहोत. या प्रसंगाच्या अनिश्चीततेमुळे लोकांना कदाचित भीती आणि काळजी वाटत असेल. अशा वेळी आपला उत्साह, हर्षोल्हास, आंतरिक समतोल आणि मानवी कल्याण यांची वृद्धी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते, जेणेकरून आपला प्रभाव आपल्या सभोवतालच्या लोकांचा उद्धार करणारा ठरावा.
यासाठी सद्गुरूंनी देऊ केली आहे एक सोपी पण शक्तिशाली साधना, एक दैनंदिन सराव ज्यापासून आपण लाभ घेऊ शकतो.
सद्गुरूंनी देऊ केलेला दैनंदिन सराव
योग योग योगेश्वराय हा मंत्र (12 वेळा) आणि यानंतर ईशाक्रिया ध्यान
हा सराव कसा करावा?
पहिला टप्पा:या साधनेची महती समजून घ्या.
दुसरा टप्पा:योग योग योगेश्वराय हा मंत्र शिका
तिसरा टप्पा:ईशाक्रिया शिका
चौथा टप्पा:योग योग योगेश्वराय आणि यानंतर ईशाक्रिया यांच्या दैनंदिन सरावासाठी चा व्हिडीओ
सिंह क्रिया
एक सोप्पी योग क्रिया रोगप्रतिकारक शक्ती आणि फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी
या कठीण काळात आधारासाठी सद्गुरूंनी देऊ केलीये एक सोप्पी प्रक्रिया आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि श्वसनसंस्थेची शक्ती वाढवण्यासाठी.
सरावासाठीचे नियम
१. तुमचे पोट पूर्ण भरलेले नसावे, तुम्ही थोडेसे भुकेलेले असायला हवे. खाल्ल्यानंतर सराव करायचा असल्यास अडीच तासांचे अंतर असणे आदर्श आहे.
२. सहा ते सत्तर वर्षांमधील कोणीही हा सराव करू शकते, त्यांची शारीरिक आणि वैद्यकीय परिस्थिती कशीही असली तरीही.
३. सहा वर्षांखालील आणि सत्तर वर्षांवरील व्यक्ती सुद्धा हा सराव करू शकतात, पण त्यांनी श्वासांची संख्या फक्त १२ ठेवावी (२१ नाही.)
४. ब्रेन हॅमरेज किंवा ब्रेन ट्युमर असणाऱ्या व्यक्ती देखील हा सर्व करू शकतात, पण त्यांनी श्वासांची संख्या फक्त १२ ठेवावी (२१ नाही.)
अंतर्मुख व्हा: साधना शिकण्यासाठी नोंदणी करा
नुकत्याच झालेल्या दर्शनात सद्गुरु म्हणाले: “जरी तुम्ही कुठेही असलात, तुम्ही तुमचं नाव देऊन नोंदणी केलीत तर आम्ही तुमच्यासाठी एक मार्गदर्शित साधना तयार करू. तुम्ही कुठल्याही टाईम झोनमध्ये असा; त्या वेळेप्रमाणे आम्ही तुमच्यासाठी मार्गदर्शित साधना तयार करू, जेणेकरून तुम्ही तुमची रोजची दिनचर्या स्वतःहून कसा हाताळली पाहिजे हे तुम्हाला कळेल.”
जेव्हा आपण कठीण प्रसंगांना सामोरे जातो तेव्हा आपली बुद्धिमत्ता, आरोग्य आणि समतोल यांना खूप महत्त्व प्राप्त होते. अंतर्मुख होणे त्या वेळेला अधिक महत्त्वाचं ठरतं. जर या एकांतवासाचा उपयोग तुम्हाला तुमच्यात अधिक हर्षोल्ल्हास आणि समतोल यावा यासाठी करायचा असेल तर तुम्ही चाळीस दिवसांच्या सूत्रबद्ध साधनेसाठी नोंदणी करू शकता.
ज्यांनी यासाठी नोंदणी केली आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून त्यांना परिवर्तनासाठी जास्तीची योग साधने आणि आरोग्य व कल्याणासाठी उपयुक्त टिप्स वेबिनार आणि पत्राद्वारे आणि याशिवाय बरंच काही 40 दिवसांच्या कालावधीत देऊ.
जर तुम्ही इनर इंजीनियरिंग कार्यक्रम केला असेल आणि शंभवी महामुद्रेची दीक्षा घेतली असेल तर आम्ही सद्गुरूंनी तयार केलेल्या दैनंदिन सरावाचे वेळापत्रक तुम्हाला देऊ आणि तुमच्या सरावासाठी तुम्हाला आणखीन मदतही देऊ.
चाळीस दिवसाच्या साधना शिकण्यासाठी येथे नोंदणी करा